आळंदीत लाँकडाऊन प्रभावी ; गरजुंची अन्नदान सेवा उत्साहात

768

अर्जुन मेदनकर,आळंदी :

येथील ग्रामस्थ व आळंदी नगरपरीषद नगराध्यक्षा वैंजयंता उमरगेकर यांचे प्रेरणेतुन शहरातील गरजुंना दोन वेळचे अन्नदान वाटप सेवा सुरु असुन या सेवेने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आळंदी नगरपरीषदेने गरजुंसाठी बेघर व स्थलांतरीत कामगार वगरजुंसाठी निवारा केंद्र सुरु केले आहे.या ठिकाणी सुमारे तीनशे गरजुंची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले.
येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेतुन अन्नवाटपास रवाना केले जात आहे.सामाजिक कार्यकर्ते कृृृष्णाजी डहाके ,मंडुबाबा पालवे, गंगोत्री साहेब,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर ,स्वामी सुभाष महाराज यांचे हस्ते पाठविण्यात आले.

श्री ज्ञानेश्र्वरी मंदीरात देखील रोज सुमारे तीनशेवर गरजुंना विष्णु महाराज केंद्रे,भास्कर महाराज पवार यांचे वतीने अन्नदान सेवा गरजुंसाठी केली जात आहे.माजी नगरसेवक वासुदेव घुंडरे यांचे लक्ष्मी मंगल कार्यालयातुन निवारा केंद्रातील गरजुंना भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.येथील जलाराम सत्संग मंडळा तर्फे दोनवेळ गरजुंची भोजन व्यवस्था करण्यात येत आहे.आळंदीतील विविध सेवाभावी संस्था ,दानशुर व्यक्ती ,पदाधिकारी यांचे सहकार्याने बेघर,गरजु तसेच लाँकडाऊन मध्ये अडकलेले कामगार,मजुर यांचेसाठी भोजन व्यवस्था तसेच गरजु अत्यावश्यक किराणामाल साहित्याचे वाटप केले जात आहे.यासाठी गणेश गरुड,दिनेश घुले,सचिन गिलबिले,प्रकाश कु-हाडे,स्वामी सुभाष महाराज आदीं पदाधिकारी यांनी मदत कार्य सुरु केले आहे.
आळंदी मंडलाधिकारी चेतन चासकर,मुख्याधिकारी समिर भुमकर,नगराध्यक्षा वैंजयंता उमरगेकर,वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांचे माध्यमातुन शहरात लाँकडाऊन कार्यवाही प्रभावी पणे सुरु आहे.यासाठी जनजाग्रुती केली जात आहे.