Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीलॉकडाऊनची ऐशी तैशी तर सोशल डिस्टन्सिंग वाजला बोजवारा..

लॉकडाऊनची ऐशी तैशी तर सोशल डिस्टन्सिंग वाजला बोजवारा..

गणेश जाधव, कोंढवा

देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला आणि संपूर्ण शासकीय व्यवस्था खडबडून जागी झाली तसेच नागरिकांना लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यास आव्हान करू लागली परंतु काही उपद्रवी लोक याचे पालन न करता सर्रास रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र कोंढवा परिसरात पाहायला मिळाले .

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत शिवनेरीनगर भगवा चौक परिसरात सर्रासपणे गल्लोगल्ली भाजीविक्रेते हातगाडीवर भाजी विकत असल्याचे पहावयास मिळाले .पुण्यासारख्या शहरात संचारबंदीची अशी परिस्थिती असणे म्हणजेच कोरोना विषाणूला निमंत्रण देण्यासारखे आहे .लॉकडाऊनचा ,सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडवत भाजीविक्रेते ,सर्वसामान्य नागरिक प्रशासनाची खिल्ली उडवत आहे असे म्हणावे लागेल.


लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवद दैनंदिन भाजी, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांचा जमाव गटागटाने एकत्रित येत असल्याचे चित्र उघड झाले आहे .महानगरपालिका, पोलीस प्रशासन ,सुजाण नागरिक वारंवार ” घरात राहा , सुरक्षित रहा ” याबाबत सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करत असून देखील नागरिक कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता उघडपणे बाहेर फिरत असल्याचे पहावयास मिळत आहे . प्रशासनाने दिलेल्या जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेचे पालनदेखील होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, करत लोक आपल्या जिवाशी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या जीवाशी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे संचारबंदी आहे. एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकाने घरी बसण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना लोकांना त्याचा विसर पडल्याचं प्रकर्षाने जाणवत आहे.

आता या परिसरातील लोकप्रतिनिधीनी बाहेर येऊन लोकांना समजावून सांगून घराबाहेर न पडण्याचे आवाहन करून कोंढवा परिसर कसा  कोरोना मुक्त होईल याकडे  लक्ष द्यायला हवे , प्रसंगी कठोर निर्णय घेऊन राजस्थान मधील भिलवाडा पॅटर्न तसेच बारामती पॅटर्न राबवून परिसरात संपूर्णपणे लॉक डाउन करून सर्व व्यवहार तीन ते चार दिवस बंद ठेऊन कोंढवा कोरोना मुक्त करण्यास हातभार लावण्याचा आहे, याप्रसंगी कुठलेही राजकारण न करता , धर्मवाद न करता फक्त आपण कोरोना वर मात करण्यासाठी कठोर निर्णय घेत आहे हे लोकांना पटवून सांगायला हवे.  नाहीतर पोलिसांनी सुद्धा लष्कराला किंवा केंद्रीय पोलिसांना पाचारण करून हा परिसर कोरोना मुक्त करून एक नवा आदर्श निर्माण केला पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त दिवस रात्र एक करत आहेत पण लोक प्रशासनास सहकार्य करत नाहीत.

मल्हार न्यूज च्या माध्यमातून सर्व वाचकांना आवाहन करण्यात येत आहे तुम्ही ,”घरी राहा सुरक्षित रहा”, मास्कचा वापर करा, स्वच्छता राखा, विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नका ,पोलीस प्रशासनास सहकार्य करा..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!