Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागातील 18 हजार 59 नमून्यांची तपासणी पूर्ण ;16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह तर 1 हजार 905अहवाल पॉझिटिव्ह

     पुणे दि. 30:-पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

            विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 13 बाधीत रुग्ण आहेत.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत.  तर 268 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ॲक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

                 आजपर्यत विभागामध्ये एकूण  19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

         आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!