Friday, March 21, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडउरण तालुक्यातील मोरा येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून...

उरण तालुक्यातील मोरा येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

गिरीश भोपी, रायगड

: जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील श्री.सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील उरण-मोरा आय.ए.सी.एल.कंपनी जवळील सुनिल कृष्णा कोळी यांचे घर ते पश्चिमेकडील डोंगरभाग ते पूर्वेकडील समुद्र किनारा हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!