अमर लिगड़े ,पुणे
कोरोना कोरोना ….फेब महिन्या पासून याची दहशत सामान्य जनतेमध्ये वाढली,सगळ्या मित्र परिवार मध्ये या गोष्टीची चर्चा सुरू झाली,तसेच टिंगल देखील होउ लागली.
अमुक तमुक ठिकाणी कोरोना ग्रस्त व्यक्ति आढळली हे ऐकून त्या बाबत चर्चा होउ लागल्या.पन तीच गोष्ट जर आपल्याच घरात आली तर ??
23rd मार्च ला लॉक डाउन सुरु झाले,पक्षी आणि प्रान्यांप्रमाणे मनुष्य पिंजरयात बन्द झाले.एप्रिल च्या पहिल्याच आठवड्यात माझ्या लहान भावाची तब्यत खालवली,नेहमी प्रमाणे फैमिली डॉक्टर कडून ट्रिटमेंट घेतली आणि त्या प्रमाणे फरक ही जाणवला.पण पूर्ण पणे ताप कमी नाही झाला.मग मि आणि मधल्या भावाने त्याला जवळच्या प्रतिष्ठित (फ़क्त नावाने) हड़पसर परिसरातील नामंकित हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो, त्यांनी 3 ते 4 गोळ्या देऊन 500rs ची फीस घेतली.आणि घरी पाठवले.
सध्याची परिस्तिति पाहाता कोरोनाची चाचणी करण्याचे ठरवले,गोंधळलेल्या अवस्ते मध्ये private मध्ये आम्ही त्याची कोरोनाची चाचणी केली पण त्याचे report यायला पण 2 दिवस लागणार होते.भावच्या चाचणी नंतर त्याच दिवशी अचानक आई ला श्वास घ्यायला त्रास होउ लागला,लगेचच जवळच्या क्लिनिक मध्ये घेऊन गेले असता त्यांनी आम्हाला मोठ्या हॉस्पिटल मध्ये हलवायला सांगितले.मि गाडीवर घेऊन जात असताना आईला श्वास घ्यायला त्रास होत होता.माझ्या डोक्यात लाखो विचार धुमाकुळ घालत होते.
पुन्हा त्याच होस्पिटल मध्ये आईला admit केले,xray पाहता निमोनिया किवा कोरोना याची लक्षणे दिसत होती.असे डॉक्टर म्हणाले,आईला ICU मध्ये शिफ्ट केल.तसेच कोरोनाची टेस्ट केली त्याचे रिपोर्ट उद्या येणार होते,त्या 24 तास मध्ये मि सगळ्या देवांची नाव घेऊन झाली.रात्री झोपहि लागली नाही.शेवटी रिपोर्ट आला,आणि ज्या गोष्टिची भीति होती तेच झाल,रिपोर्ट positive होता..
मि पुरताच संपलो कारण इतक्या दिवस बाहेर असणारा कोरोना आता माझ्या घरात शिरला होता.आम्ही लगेचच आईला स्टेशन परिसरातील एका सरकारी हॉस्पिटल मध्ये हलवायचे आम्ही ठरवले.पण त्यासाठी हड़पसर परिसरातील नामंकित हॉस्पिटलचे पूर्ण बिल paid करण गरजेचे होते, 2 ते अडीच दिवसाच बिल त्यांनी 1 लाख 10 हजार लावले,एवढं बिल पाहुन त्या हॉस्पिटल च्या व्यवस्थापनेला सांगावस वाटल की फ़क्त आई admit होती पूर्ण family नाही.कोरोना सारख्या यूनिवर्सल प्रॉब्लेम असताना एवढं बिल लावाव हिच एक मोठी शोकांतिका आहे.त्यातच त्यांनी “आईची प्रकृति इथे स्थिर आहे तर इथेच राहूदया” अस सांगितले.विचार केला अडीच दिवसाच एवढ बिल लावनारे 15 दिवसाच किती बिल लावतील,या विचारानेच हात पाय गळाले.त्या कोरोना पेक्षा हॉस्पिटलच्या बिलानेच माणसे जास्त दगावतील असा विचार येऊ लागला.राग तर खुप येऊ लागला.पण ती वेळ वाद घालन्याची नव्हती,नाशिबाने आईचा insurance असल्या मुळे बिलाची चिंता जास्त नव्हती,तसेच इथे माझ्या बरोबर पूर्ण फैमिलीची चाचणी करणे आवश्यक होते,स्टेशन परिसरातील एका सरकारी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी एम्बुलेंस बोलावली.आगी सारखी बातमी पसरत होती.मला खुप कॉल येऊ लागले,आमचा सगळा परिसर सील करण्यात आला.आम्ही सगळे स्टेशन परिसरातील एका सरकारी हॉस्पिटल पोहचलो.आईला BP,sugar आणि thyroid असल्याने त्या हॉस्पिटल मध्ये तिला एडमिट करण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित हॉस्पिटल ने सरळ हात वर केले. मला धक्काच बसला मि फाळणी मधल्या एका निर्वासिता सारखा त्यांच्या कडे बघत होतो. थोड्या चर्चे नंतर त्यांनी तिला “लवले येथील मेडिकल कॉलेज” ला रवानगी केली. दरम्यान लहान भावाचा report देखील आला तोहि positive.
एकाच दिवशी आई आणि लहान भावाचे रेपोर्ट पॉजिटिव आले.तसेच उरलेले आम्ही चौघे (मधला भाऊ,पप्पा,आजी आणि मि) quarantine म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले.लहान भाऊ तरुण असल्यामुळे त्याच्या पेक्षा आईची काळजी जास्त होती,आईकडे मोबाइल नव्हता,contact म्हणून कोणिच नव्हतं.काही दिवसापुर्वी हसत खेळत असणार कुटुंब पत्या प्रमाने विखुरल गेल होत.
पुढच्या दिवशी आमच्या चौघचे report negative आले,बुडत्याला तेवढाच काडीचा आधार कारण त्यात आजीच वय हे 80 वर्ष होत,त्या दिवशी आणि पुढच्या 2 दिवस मला कॉलचा महापुर आला.सगळ्यांना उत्तरे देऊन माझ्या तब्यातीवरही परिणाम झाला.साला मला पण वाटल अपून को भी कोरोनो हो गया ?? पण देवाच्या कृपेने तो फ़क्त वायरल होता.इतके unwanted कॉल्स मध्ये काही कॉल्स खुप आधारचे होते,त्यात माझी ताई,काका,मामा व इतर होते तसेच माझा सेलेब्रिटी मित्र #राहुल_बेलापुरकर याच्या फ़ोन मुळे माला जणुकाही हत्तीच बळ आले. नेहमी प्रमाणे सकारात्मक energy देउन त्याने कोरोनाची भीतिच नाहिशी केली.
आईच्या वार्ड मधल्या एका महिले मुळे आई बरोबर contact झाला,तेव्हा आई मोबाइलवर बोलताना खुप रडली आणि मि इथे मनातुन रडत होतो,पण आईला खुप धीर दिला,इथे अभिनय कामाला आला. कारण तिच रडन ऐकून मि पूर्णपणे ढासळलो होतो पण मि दाखवल नाही, त्या महिलेने आईची काळजी घ्यायच आश्वासन दिले.तेव्हा थोड़ा जीवात जीव आला,देवाने जणु काही आमच्या साठीच तिला तिथे आणले.3 दिवसा नंतर थोड़ वादळ शांत झाल्या सारख वाटल,पण त्या वादळाने उध्वस्त केलेले संसार सावरन्याचा प्रयत्न चालू होता.
जिथे आम्हाला quarantine केले तिथली अवस्था पाहता अस वाटल, negative लोक देखील positive होतील की काय याची भीति होती.कारण व्यवस्था सुमार होती.तिथल जेवन,नाश्ता house keeeping ची मुले देत होती,10 मि पूर्वी washroom clean करून गेलेला मुलगा तोच नंतर जेवन घेऊन येतो.3 वेळा आवाज दिल्या नंन्तर पाण्याची 20 ltr ची बाटली यायची ती पण 25 जणांन मध्ये 1.पहिले 4 दिवस चहाच नाव नव्हतं.पण नंन्तर वाढत्या लोकांमुळे व्यवस्थाची पातळी खलावली जात आहे असे दिसले.
आम्हाला सांगितले की 7 दिवसा नंतर पुन्हा कोरोना चाचणी होणार,त्या नुसार आम्ही वाट पहिली पण 7 दिवसा नंन्तर आमच त्यांच्या लिस्ट वर नावच नव्हतं अस सांगण्यात आल.नंतर कळल तिथल्या अधिकाऱ्या मुळे काही घोळ झाला.त्यामुळे डॉक्टर आणि तिथल्या कॉर्पोरेशन च्या अधिकार्या मध्ये वाद झाले.आणि आमचा तिथला मुक्काम वाढला.दरम्यान आईची तब्यत स्थिर होत होती.आमच्याशी ती बोलत होती.ऑक्सीजन मास्क देखील काढले आणि तिला ICU मधून जनरल वार्ड मध्ये शिफ्ट केल्या मुळे आम्ही सगळे निश्चिंत होतो.लहान भावाची प्रकृति देखील चांगली होत होती.त्यामुळे आता जीवाचि काळजी मिटली होती.
आमची चाचणी झाली आणि त्याचे रिपोर्ट यायला देखील 3 दिवस लागले मुळात रेपोर्ट लवकर आले होते पण त्यांच कामकाज एवढ कमकुवत होते की आमचे रिपोर्ट त्यांना सापडत नव्हते,म्हणून अजुन दोन दिवस आम्हाला थांबवल. बरोबर 12 दिवस आम्ही तिथे होतो.दिवसातून 4 वेळा follow up घेतला तेव्हा कुठे तरी त्यांनी आम्हाला त्या दिवशी सोडल अर्थातच रिपोर्ट nagative होता म्हणुन.
एम्बुलेंस ने आम्हाला घरी सोडल,कॉलोनी पूर्ण शांत होती.त्याच कॉलोनी मध्ये माझे मावशी आणि काका होते त्यामुळे काळजी नव्हती,तसेच काका मुळे आई admit झाल्या पासून ते घरी येई पर्यत खुपच मदत झाली.घरी गेल्यावर सगळे कपड़े आणि चादरी धुतले तसेच पूर्ण घर सेनीटाईज़ करून घेतले.2 दिवसा नंतर आईला सोडल 15 दिवस तिच्या वर उपचार केल्यानंतर जेव्हा तिला सोडल तेव्हा तिच्यात वेगळा उत्साह होता तो म्हणजे आम्हाला भेटन्याचा आणि पुन्हा घरी यायचा.
एम्बुलेंस ने आईला गेट जवळ सोडल जेव्हा आईने गेट मधून एंट्री घेतली तेव्हा कॉलोनी मध्ये काही जन एकत्र होऊन आईने कोरोनावर मात केली म्हणुन सर्वानी टाळय वाजुन तीच अभिनदंन केले व तसेच मावशीने औक्षणही केले. मानुसकीचा वेगळ रूप पहुंन माझ्या आणि आईच्या डोळ्यांत पाणी आले.आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळच चित्र पाहायला मिळाल.आणि त्यामुळे वेगळाच confidence आला.त्याच दिवशी रात्रि भावाला पण सोडल तसेच पुढच्या दिवशी मधला भाऊ आणि आजी पण घरी आले,पूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र झाल जे 16 दिवस विखुरल गेल होत.
आता सध्या सगळे घरिच quarantine आहे. पूर्ण काळजी आणि स्वछता याच्या कड़े जास्त लक्ष आहे.
या दिवसात खुप काही पहिल, आयुष्याने समोर मांडून ठेवलेल्या एका अविस्मरणीय अनुभवातुन गेलो,एक गोष्ट समजली की कोरोना हा एक पिंजऱ्यातल्या वाघा सारखा आहे,ज्याला आपण बाहेरुन पाहतो आणि त्याची टिंगल करतो,त्याच्या वर हसतो पण तोच वाघ जेव्हा आपल्या घरात शिरतो तेव्हा तो पूर्ण घर उद्ध्वस्त करतो.मि घाबरवत नाहीये कोरोनाचे पेशंट बरे होतात माझ्या आई आणि भावा सारखे, पण हे युद्ध होत 14 दिवसांच.आपणही सगळे सध्या युद्धावरच आहोत पण हे युद्ध आपण घरात राहून जिंकु शकतो.कारण आता कोरोना रुपी वाघ बाहेर फिरतोय.आणि त्याला घरात राहुनच संपवता येईल. माझ्या कुटुंबा वरती आलेला हा प्रसंग कोना वरती येऊ नये म्हणून हा छोटा लेख लिहिला.
So please stay home stay safe….
अमर लिगड़े ,पुणे