कोरोना सर्वेक्षण संदर्भातील शिक्षकांना अनेक समस्या

721

पुणे प्रतिनिधी

शिक्षकांना प्रशासनाकडून घरोघरी कोरोना सर्वेक्षणासाठी दर दिवशी 100 घरांची अट ठेवण्यात आली होती त्यातच शिक्षक दररोज कडक उन्हात कोरोना सर्वेक्षण करत घरोघरी जात आहेत व शक्य तितक्या घरांचा सर्वेक्षण पूर्ण करत आहेत परंतु त्यातच रामटेकडी- वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वेक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली या नोटीसाचा निषेध करत कार्यरत असलेले शिक्षक वर्ग करत आहेत त्यातच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते सचिन डिंबळे यांनी विद्यमान नगरसेवक प्रशांतदादा जगताप यांच्याशी या विषयावर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे सुचविले त्याप्रमाणे नगरसेवक प्रशांत दादा जगताप यांनी त्वरित रामटेकडी वानवडी विभागाचे उपायुक्त कुंजन जाधव यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून सदर बाब अतिशय चुकीची असून शिक्षकांवर अशा प्रकारे अन्याय होणे हे गैर आहे. संबंधित प्रशासनाची कानउघडणी करून शिक्षकांना लवकरात लवकर कार्यमुक्त करावे अशी विनंती देखील करण्यात आली.. शिक्षक गेली 34 दिवस कोरोना सर्वेक्षणाचे काम करत आहे परंतु प्रशासन त्याकडे डोळेझाक करून वेळ मारून नेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.