स्टेरिंग खराब होऊनही नागालँड रॅलीत तिसरा क्रमांक पटकाविला

196

पुण्याची निकिता टकले – खडसरे 2022 च्या शेवटच्या हंगामात चमकली

पुणे (प्रतिनिधी)
कोहिमा, नागालँड येथे INRC रॅलीची फेरी झाली अन इंडियाने 2022 चा एक अप्रतिम हंगाम संपवला, नागालँडला अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत स्टेरिंग खराब होऊनही व चावी तुटूनही माघार न घेता निकिता टकले – खडसरे ने चांगला परफॉर्मन्स दाखवत तिसरा क्रमांक पटकाविला.

नागालँडमध्ये अखंड दृढतेसह अनुभवी चालक चेतन शिवरामने पहिला क्रमांक पटकावला आणि तो आणि INRC 2 श्रेणीतील शोडाउनमध्ये एकूण रॅलीत दुसरा-सर्वोत्तम ठरला. कोहिमा येथे अर्णव प्रताप सिंग अव्वल ठरला जेआयएनआरसी श्रेणीत त्याने पोडियम आणि दुसरा क्रमांक पटकावला.
निकिता टक्कले खडसरेने ज्युनिअर इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (JINRC) मध्ये तिसरा क्रमांक पटकाविला.

थंडीच्या वातावरणात स्पर्धेकांना रॅलीत आव्हान….
नागालँड कोहिमा येथे झालेल्या रॅलीत स्पर्धेकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, यामध्ये कडाक्याची थंडी, त्यात इंजिन समस्यांमुळे गाड्या सुरु झाल्या नाहीत, धुके असल्याने वाहने धडकली पहिल्याच दिवशी दहा स्पर्धक रॅलीतून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी साधारण सुमारे अठ्ठावीस स्पर्धक सहभागी झाले.

या रॅलीत भारतातून सुमारे 70 कार रॅली स्पर्धक सहभागी झाले होते परंतु अनेकांना अडचणी आल्याने सहभागी होऊ शकले नाहीत
रॅलीचे आयोजन नागालँड ऍडव्हेंचर क्लबने केले होते.

नवखी असताना दिग्गज खेळाडूंपुढे निकिताचे अनोखे यश….
निकिता टकले – खडसरेने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षापासून कार रॅलीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली अल्पावधीतच भारतात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये दिग्गज अनुभवी स्पर्धक सहभागी असताना नवख्या निकिताने प्रत्येक स्पर्धेत आपली चमक दाखवली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते.

यावर्षी निकिता इंडियन नॅशनल आटो क्रॉस चॅम्पियनशिप सह सहा ते सात रॅली मध्ये सहभागी होणार आहे.
आगामी स्पर्धेत भारत व परदेशात होणाऱ्या रॅलीत यश मिळविण्याचा संकल्प निकिताने व्यक्त केला आहे.