Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेवाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजवंतांना मदत

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजवंतांना मदत

पुरंदर प्रतिनिधी,

:सर्वदूर कोरोनाचे संकट पसरले असताना अनेकांना रोजगार उपलब्ध नाही ,दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये खळद(ता.पुरंदर) येथे गावच्या माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा रेश्मा आबनावे व दैनिक सकाळचे पत्रकार योगेश कामथे यांचे चिरंजीव पृथ्वीराज योगेश कामथे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी कोणताही डामडौल न करता आपला समाज सुरक्षित तर आपण सुरक्षित या भावनेतुन गरजवंत नागरिकांना अन्नधान्याचे वाटप व सुरक्षा कवच म्हणून मास्कचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके ,निरा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, माजी सरपंच चंद्रकांत कामथे, कडेपठार पतसंस्थेच्या संचालिका संगिता कामथे,तलाठी बाबुराव आगे, ग्रामसेवक सुरेश जगताप,ग्रा.प.सदस्या अलका राऊत,मनिषा कामथे, हिराबाई कांबळे,अलका कामथे,स्वाती कामथे,दिपाली कामथे,कविता कामथे,आरती आबनावे,पाडुरंग रासकर,शिवाजी कामथे,विठ्ठल आबनावे,संदिप कांबळे,अविनाश आबनावे यांच्यासह अनेक प्रमुख उपस्थित होते.
खळदला वैचारिक अधिष्ठान असून या कोरोना महामारीच्या संकटामध्ये सर्व गाव सर्व नागरिक सर्व जात-पात विसरून या गावातील शेवटच्या घटकापर्यंत कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत मदतीसाठी पुढे आले असून हे कौतुकास्पद असून मोलमजुरी करणाऱ्या संदीप कांबळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नधान्य वाटप करण्याचा पाडलेला पायंडा आज गावच्या माजी उपसरपंच रेश्मा आबनावे व पत्रकार योगेश कामथे यांचे चिरंजीव पृथ्वीराज कामथे यांनी पुढे चालवत वाढदिवसाच्या निमित्ताने गरजवंताना अन्नधान्याचे व मास्कचे वाटप होत आहे असाच उपक्रम यापुढे जास्तीत जास्त नागरिकांनी राबवावा ह्यातून आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळते असे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांनी सांगत नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
तर बाळासाहेब कामथे यांनी या संकटाच्या काळात गावातील नागरीक असो अन्यथा बाहेरील मोलमजुरी करणारा नागरिक असो या सर्वांची काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश कामथे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!