Sunday, November 16, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे

कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे

अशोक आव्हाळे,मांजरी

मांजरी खुर्द येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या नेतृत्वाखाली आज कोव्हीड 19 संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. गाव कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने गावात येणारे तीन ही रस्त्यावर चेकपोस्ट नाके उभारण्यात यावे. येथील बंदोबस्तासाठी मी लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याशी बोलुन घेतो. येथे मेडिकल तपासणी करावी, याठिकाणी येणारे प्रत्येक वाहनांवर सॅनिटायजरची फवारणी करावी हॅडल, स्टेरिंग ,चाके,यावर फवारणी करावी. ताप मापकाच्या साहयाने प्रत्येक व्यक्तीचा ताप मोजावा जर जास्त ताप असेल तर लगेच आरोग्य केंद्राला कळवावे असे कोहिनकर यांनी ग्रामपंचायतला आदेश दिले. गावासाठी 7 शिक्षक व 3 आशा वर्कर्स नेमले तर सर्व्हे चांगला होईल, यासाठी स्टाप कमी पडत असेल तर तो मी देतो. ग्रामपंचायतला या कामासाठी खर्चाच्या सर्व परवानग्या दिल्या आहेत असे संदीप कोहिनकर यांनी सांगितले. या आजाराचा प्रसार प्रायव्हेट हॉस्पिटल, प्रायव्हेट ओ पी डी, मेडिकल, गर्दीच्या ठिकाणी होतो म्हणुन याकडे लक्ष द्या. गावातील मेडिकलवाले यांनी रोज विक्री केलेल्या औषधांचे आपडेट ग्रामपंचायतला दयावे अशी सुचना कोहिनकर यांनी केली.
मांजरी गावात सर्व कुटुंबांना साबण व सॅनिटायजरचे वाटप केले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मागणी प्रमाणे गोळ्या, औषधे व साहित्य दिले आहे. गावात सोडीयम हायकलोराईडची जंतुनाशकाची फवारणी करुन घेतली. रेशन कार्ड नाही असे मजुर/ भाडेकरु 468 लोकांची शरद भोजन योजनेसाठी समावेश केला आहे. रोज 166 कुटुंबांचा सर्व्हे असे,तसेच 2/5/2020 नुसार गावची लोकसंख्या 6953 असुन 1409 इतकी कुटुंबाची संख्या असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले. यामध्ये 1409 कुटुंबांचा सर्व्हे केला असता 31 लोकांना ताप/सर्दी/ खोकला आहे त्यांना औषधे दिली आहे गावात कोरोना बाधित रुग्ण तीन आहे पैकी एक मयत झाला आहे. आणि दुसरे दोन्ही रुग्ण स्टेबल, चांगले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गायकवाड यांनी सांगितले. साधारणपणे 38 लोकांना होमकाॅरंटाईन करण्यात आले आहे. पैकी 4 लोकांना जि प प्रा. शाळेत होमकाॅरंटाईन केले आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ सचिन खरात, वैद्यकिय अधिकारी डॉ वर्षा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, सरपंच प्रतिमा सचिन उंदरे, किशोर उंदरे, विकास उंदरे, महादेव उंदरे, सचिन आण्णा उंदरे, स्वप्निल उंदरे, हिरामण गवळी, समिर उंदरे, सोमनाथ आव्हाळे, अशोकराव आव्हाळे इ .उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!