येवलेवाडीत आरोग्य शिबीर संपन्न

335

वानवडी प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोंढवा नगर(कात्रज भाग) व पुणे पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेन्टर कोंढवा यांच्या संयुक्त विद्यमाने, कोंढवा परिसरातील, येवलेवाडी गावातील पानसरे वस्तीत”, करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याचा अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला.

शिबिराचे आयोजन ,हनुमान तालीम येवलेवाडी गावठाण या ठिकाणी करण्यात आले होते ५२७ नागरिकांचे स्क्रिनिंग, प्राथमिक आरोग्य तपासणी ,औषधोपचार व वैद्यकीय प्रबोधन करण्यातआले. सर्व नागरिकांना आवर्जून होमिओपॅथी गोळ्या देण्यात आल्या.
सुयोग्य नियोजन व सोशल डिस्टनसिंग यांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.नगरसेवक अनिल येवले , शकील पानसरे, धनंजय पोकळे ,शाहिद पानसरे, नदाफ, किरण धुमाळ,महेश जाधव व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संघाचे, कोंढवा नगर कार्यवाह, सतीश गुंजाळ, व्यवस्था प्रमुख अभिषेक दनाने या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कात्रज सुभाष रायचूरकर, मंदार सहस्त्रबुद्धे बाळासाहेब बोत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .
पुणे पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेन्टर(कोंढवा) यांनी सर्वार्थाने वैद्यकीय योगदान दिले. संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन झोडगे, डॉ. अक्षय दोरे तसेच प्रशासकीय अधिकारी हर्षद झारे ,जनसंपर्क प्रमूख संजय कुलकर्णी यांचा सक्रिय सहभाग होता.