पुणे प्रतिनिधी,
कँप पुणे येथील नेत्रतज्ञ डॉ जीवन लाडी यांनी शोधलेल्या अभिनव पद्धती साठी इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. मोतीबिंदू शत्रक्रियेमध्ये डोळ्यांची बघण्याची क्षमता अचूक व नैसर्गिक राहण्यासाठी लेंस बसवली जाते. त्याला लेंस इम्पलांट असे सुद्धा संभोधले जाते. बदलत्या राहणीमानानुसार चष्म्याचा वापर कमी करण्यासाठी तसेच सोयीस्कर असण्यासाठी एकाच वेळी लांबचे व जवळचे स्पष्ट दिसणारी मल्टिफोकल लेंस बसवून धेणें अनेकजण पसंद करतात. सर्व व्यक्तीनंमधे तसेच एकाच व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांची लेंस पॉवर भिन्न असते. अशावेळी या लेंसची पॉवर अचूक असणे गरजेचे असते. नेत्रतज्ञ डॉ जीवन लाडी यांनी अभिनव पद्धतीचा शोध लावला आहे, जेणेकरून लेंसची पॉवर अचूक येते. विशेष म्हणजे भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञाने हा शोध लावला आहे. प्रचलित विदेशी पद्धतीपेक्षा ही सोपी असून दहा ते बारा पटीने कमी खर्चिक आहे. डॉ जीवन लाडी ही पद्धत गेल्या ४ वर्षापासून वापरत आहेत व सर्व रुग्णांना त्याचा खूप फायदा झाला आहे. “द लाडी मेथड” ही भारतीय कॉपीराइट संस्थे मधे बौद्धिक प्रॉपर्टी राईट्स म्हणून रजिस्टर्ड आहे. भारतीय तसेच विदेशातील अनेक नेत्रतज्ञ अचूकतेमुळे या पद्धतीचा मोठ्या प्रमाणांवर वापर करत आहेत.