अलंकापुरीत सूर्यग्रहण काळात इंद्रायणी नदीत उपासना

1331

अर्जुन मेदनकर,आळंदी

तीर्थक्षेत्राचे स्थान माहात्म्य असलेल्या इंद्रायणी नदीत उपासकांनी सूर्यग्रहण काळात इंद्रायणी नदीचे पात्रात उभे राहून परंपरांचे पालन करीत उपासना केली.शेकडो हिंदू साधक उपासकांनी या उपासनेत भाग घेतला.भारतीय संस्कृतीत ग्रहण काळात विविध धार्मिक साधना केल्या जातात.या मध्ये ध्यानधारणा,नामस्मरण,जप,आराधना आदींचा समावेश होतो. 
 आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी पाण्यात उभे राहून सूर्यग्रहण काळात अनेक साधकांनी साधना केली. सूर्यग्रहण काळात ग्रंथ पठण,मंत्र जप साधना तसेच या अनुषंगाने विविध धार्मिक विधीची करीत परंपरेचे पालन केले.इंद्रायणी नदीत साधकांनी उघड्या अंगाने साधना करीत सूर्य ग्रहण पूर्ण होताच इंद्रायणी स्नान करून पूजापाठ नाम साधना केली. सकाळी दहा ते दुपारी दिड या कालावधी सूर्यग्रहण असल्याने यावेळेत साधकांनी नदीत उभे राहून सूर्यग्रहण पाळले.यावेळी नदीचे पात्रात उपासना कारणाना साधकांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत साधना केली. सूर्यग्रहण उपासनेचा काळ साधकांसाठी पर्वणी असून या काळातील साधनेने ज्ञान वाढत असल्याचे जाणकार सांगतात.
 संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देखील प्रथा परंपरांचे पालन करीत सूर्यग्रहण धार्मिक उपासना पूजा, विधी परंपरेने झाले.श्रींना पवमान अभिषेख पूजा तसेच श्रींचे संजीवन समाधीस जलाभिषेक झाला. श्रींचे पादुकांची पूजा सूर्यग्रहण झाल्यावर करण्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.