अर्जुन मेदनकर,आळंदी
येथील माउली मंदिर लागत असलेल्या दर्शनबारी सभागृहात तब्बल १७ दिवसांचा पाहुणचार पायी वारी सोहळ्याची परंपरा जपत श्रीगुरु पांडुरंगरायांचे भेटीसाठी आषाढी वारी पालखी सोहळ्याने माऊलींच्या चल पादुकां हरिनाम गजर पंढरीकडे शासन निर्देशांचे पालन करीत २० मान्यवरांचे समवेत आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या एस.टी.बसने वारीचे इतिहासात प्रथमच मार्गस्थ झाल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर,प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील,पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,विश्वस्त डॉ.अभय टिळक,श्रींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे,योगेश आरु, सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार,मारुती महाराज कुऱ्हेकर,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,मुख्याधिकारी समीर भूमकर,माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, नगरसेवक आदित्य घुंडरे,संदीप रासकर,पांडुरंग वहिले,प्रशांत कु-हाडे,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,डी.डी.भोसले पाटील,इंसीडन्ट ऑफिसर प्रांत संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले,पोलीस उपायुक्त स्मिता पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव,विवेक लवांड,आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर,तलाठी विकास नरवडे,बी.बी.पाटील आदींसह भाविक, वारकरी उपस्थित होते.
श्रींचे पंढरीला जाण्यास निघण्या पूर्वी मंदिरात पालखी सोहळ्याचे परंपरा प्रमाणे सकाळी साडे पाच ते साडे सहा अभिषेख,दुधारती, सात ते नऊ कीर्तन, विश्वस्त डॉ.अभय टिळक यांचे प्रवचन झाले. परंपरे प्रमाणे दुपारी बाराचे सुमारास श्रीना महानैवेद्य झाला. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य यज्ञेश जोशी,राहुल जोशी,राजाभाऊ चौधरी आदींनी केले. त्यानंतर कर्णेकरी सेवक बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परंपरेने कर्णा वाजवीत सोहळ्यास निघण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले. सोहळ्याचे संबंधित घटकांत लगबग सुरु झाली दरम्यान आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते श्रींचे पादुकांवर पुष्पहार अर्पण करीत सोहळा निर्विघन पणे पार पडावा यासाठी साकडे घालण्यात आले. नगराध्यक्षा उमरगेकर यांचे हस्ते सोहळ्यातील मान्यवर २० वारकरी भाविक,प्रांत संजय तेली ,तहसीलदार सूचित आमले,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदींचा शाल श्रीफळ देऊन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आषाढ शुद्ध दशमी (ता. ३०) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या चल पादुकां पंढरीकडे मार्गस्थ होताना सोबत वीस मान्यवर यांना सर्व नियमांचे पालन करण्यासह सामाजिक अंतर कायम राखण्याचे सूचना देण्यात आल्या. खेडचे प्रांत संजय तेली यांनी मार्गदर्शन केले.या बस मध्ये दिंडीवाल्यासह पुजारी, सेवक चोपदार, मानकरी असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले. या बस समवेत पंढरपूरला पर्यंत व परत येई पर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता. एसटी बसने प्रथमच माऊलींचे पादुका यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करीत वारीसाठी आळंदीतून एस.टी.बस वाहन चालक तुषार काशीद यांचे माध्यमातून बस पाऊणे दोनचे सुमारास आळंदी इंद्रायणी नदीचे पुलावरून पंढरीकडे रवाना झाली. या बस मध्ये पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळ सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनचे भानुदास टेंभूकर, योगीराज कु-हाडे,योगेश आरु आळंदीकर मानकरी, पुजारी,कर्णेकरी आणि शिपाई हरिनाम गजरात श्रींचे पादुकां समवेत रवाना झाले. यावेळी एसटीचे सॅनिटायझेशन करीत पुष्प सजावट व रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या. आजोळघर परिसरात श्रींचे सोहळ्यास मार्गस्थ करण्यास मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
वारीस जाणा-या वीस वारक-यांना बसमध्ये प्रवेश देताना कोरोना टेस्ट तसेच प्रवासाआधी वारक-यांना फेस शिल्ड मास्क देण्यात आले. आजोळघरातुन श्रींचे वैभवी पादुका दुपारी दीडच्या सुमारास पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते राजाभाऊ आरफळकर यांचेकडे बस मध्ये हातात देण्यात आल्या.पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई पादुकां सोबत होते. माऊलींच्या पादुका पंढरीत पोचवून पुन्हा आळंदीला आणण्याची मोठी जबाबदारी प्रांत संजय तेली यांच्याकडे आहे. यानिमित्त आळंदी मंदिरासह आजोळघर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची आषाढी वारी रद्द झाली आहे. यामुळे आळंदीतही परिसरातून भाविक येऊ नये यासाठी आळंदी पोलिसांनी काळजी घेत परिसरात प्रवेशावर मर्यादा आणल्या.