पुणे:–अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ‘समारंभ आयोजन’ समिती वर सदस्य पदी स्वाती हनमघर यांची निवड झाली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक संजय ठुबे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
या वेळी स्वाती हनमघर म्हणाल्या,आज मला फार आनंद होत आहे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळत आहे.नक्कीच मी या संधीला न्याय देऊन नवोदित कलाकारांसाठी या क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देईल.महामंडळाचे ध्येय,धोरण व उद्धिष्ट तसेच घटना नियमास अधिन राहून महामंडळाकरिता जबाबदारीने काम करेल. तसेच मी समाजसेवा ,आरोग्य या क्षेत्रात बरेच वर्षें काम करत आहे.
याप्रसंगी निर्माते प्रमोद पंडित,शुभांगी पाटील, पल्लवी तावरे यांनी शुभेच्छा दिल्या.