Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपोलिस अधिकाऱ्यांना अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये विशेष अधिकार प्रदान

पोलिस अधिकाऱ्यांना अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये विशेष अधिकार प्रदान

 पुणे 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्राप्त जमावबंदी/संचारबंदी आदेश जारी केले असून पुणे ग्रामीण जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णांचे संख्या मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. त्या कारणाने पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कायदेशीर कारवाई करण्याकरीता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दिनांक 28 जुलै 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.

            रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणूका या कोणत्याही मार्गाने,कोणत्या वेळात काढाव्यात किवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणूकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या कपड़े धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे,  कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वादये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वादये वाजविणे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिका-यांनी या अधिनियमांची कलम ३३.३५,३७ ते ४०,४२,४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे. हे अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!