संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीच्या प्रमुख विश्वस्त पदी अर्थतज्ञ डॉ.अभय टिळक

704

अर्जुन मेदनकर, आळंदी

लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त पदी अर्थतज्ञ डॉ.अभय टिळक याची निवड झाल्याचे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
यावेळी मावळते प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख या पदावरा डॉ.अभय टिळक यांनी यापूर्वी कामकाज पाहिले आहे.