सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे अवाहन ;पोलीस निरीक्षक प्रताप मानकर.

431

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रताप मानकर.

नाथाभाऊ उंद्रे, मांजरी

कोरोना महामारी संकट असल्याने गणपती बनविण्यारयासह, सजावट साहित्य, पुजा साहित्य, मंडप स्पिकर सह आर्थिक संकट समोर उभे आहे . परीसरात कोरोना संकट असल्याने यंदा सर्व धर्मिय कार्यक्रम आषाढी पंढरपूर वारी, ईद,सह अनेक सार्वजनिक कार्यक्रम नागरिकांनी साधे पणाने साजरे केले आहेत.
यावर्षी साधेपणाने साजरे करण्याचे अहवान लोणीकंद पोलीस निरीक्षक सह सर्व अधिकारी, कर्मचारी सह लोणीकंद हद्दीतील जवळपास छोट्या मोठ्या पंचवीस गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधीशी मिटींग घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही. तसेच गणेश मूर्ती मंदीरात स्थापना करावी. मंडप घालु नये. गणेश मुर्ती,साहित्य खरेदी करताना ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासनाने सार्वजनिक जागेत अंतर ठेवून गणपती विक्री दुकाने असणार आहेत. अशाच ठिकाण गणेश मूर्ती खरेदी करावी.मंडप घालु नये. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन रक्तदान शिबीर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करणे, आजारी गरीब कुठूबांना मदत करण्याचे अहवान पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.