अर्जुन मेदनकर,आळंदी प्रतिनिधी,
सुभद्रा संपतराव जाधव वय वर्षे ५५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने आळंदीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुभद्राताईंच्या जाण्याने आळंदीवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
त्यांच्या पश्चात त्यांना वडील, पती, भाऊ,बहीनी, ५ मुली, पुतणे, पुतण्या, सुना, जावई,नातू आणि नाती असा परिवार होता.पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकाचे मानकरी संपतराव जाधव यांच्या पत्नी, शिरुर ग्रामीण चे सरपंच नामदेवराव जाधव यांच्या भावजय आणि आळंदीचे पत्रकार दिनेश कु-हाडे यांच्या सासु होत.