प्रदीप चोरडियांतर्फे शिरवळ येथे इंडस्ट्रियल पार्कची घोषणा

1171

चोरडिया फूड प्रोडक्ट्स (सीएफपी) पार्क चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप चोरडिया यांनी शिरवळ येथे इंडस्ट्रियल पार्क ची घोषणा केली. हे पार्क डी झोन मध्ये येते व महाराष्ट्र सरकार याठिकाणी गुंतवणूक करून आपले नवीन प्रोजेक्ट्स किंवा प्लांट्स सुरु करण्यास उदयोगांना प्रोत्साहित करणार आहे. या प्रकल्पात फेज १ साठी व्यवसायाकरिता जवळपास २२० एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. हा प्रकल्प एमआयडीसी व महाराष्ट्र सरकार सोबत संलग्न असल्याने उद्योजकांना एमआयडीसी च्या सर्व सुविधा मिळतील. या प्रकल्पाची आर्थिक जबाबदारी ही मात्र चोरडिया ग्रुपची असेल.

या प्रकल्पातील एकूण जमिनीपैकी ६०% जमीन ही उद्योगासाठी, ३०% रहिवासा करीत व उर्वरित १०% कमर्शियल हब करीत ठेवण्यात आली आहे. कोणत्याही औद्योगिक प्रकल्पासाठी दळणवळण हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि शिरवळ येथील हा प्रकल्प पुणे बंगरुळु हायवे नजीक असून मुख्य रस्त्यापासून प्रकल्पापर्यंत खाजगी रस्ता बनवण्यात आला आहे. याशिवाय पाणी व वीज हे देखील व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी आहेत त्यामुळे या प्रकल्पात दोन्ही बाबी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आपला व्यवसाय त्वरित सुरु करता येईल.

या प्रकल्पात जमिनी व्यतिरिक्त कोल्ड स्टोरेज ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे ज्याच्या फायदा डेअरी, आईस्क्रीम व शीतपेय उद्योजकांना नक्कीच होईल. याव्यतिरिक्त उद्याने, विश्रामगृहे, उपाहारगृहे व कर्मचाऱ्यांकरिता बस सेवा देखील प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पात लघु उद्योगांना त्यांच्या गुंतवणुकीच्या ६०% इतका अतिरिक्त फायदा मिळणार आहे. याशिवाय महिला उद्योजनकांना व आरक्षित तरुणांना १०% अधिक लाभ मिळेल.

या प्रकल्पामध्यें  विविध हॉटेल्स व रेस्टोरंस्ट सोबत करार करण्याच्या विचारात आहेत. ज्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबाला त्याचा लाभ  घेता येईल.

या प्रकल्पाविषयी बोलताना सीएफपी ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप चोरडिया म्हणाले, “भारत लोकसंख्येची घनता सर्वाधिक असल्याने बेरोजगारी सारख्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे भारताने आता सेवा क्षेत्रापेक्षा उत्पादन क्षेत्र विकसित करण्यावर भर देवून चीन सारख्या देशाची एकाधिकारशाही मोडीत काढण्याची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पाची देशात स्थापना करणे काळाची गरज आहे. आज पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरवळ येथे आमचा नवीन औद्योगिक प्रकल्प चोरडिया इंडस्ट्रियल पार्कची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे.

ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या येथे गुंतवणूक करण्याऱ्या नवीन उद्योजकांना विपणन, नेटवर्क, विक्री व बँकेतून लोन मिळवून देण्यास देखील मदत करणार आहोत.”

सीएफपी पार्क मध्ये सध्या जर्मनी, यूएसए व थायलंड येथील मोठमोठ्या कंपन्यांनी आपले प्रकल्प स्थापन करण्याकरिता चौकशी केली आहे. त्यामुळे येत्या काळात याठिकाणी अनेक मोठे व लहान उद्योग आपले प्रकल्प सुरु करतील अशी अशा आहे.

आपल्या जगाला आज प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे परंतु या प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या कार्बन फूटप्रिंटला जास्तीत जास्त कमी करण्यासाठी सीएफपी फाउंडेशन प्रदूषण पातळी ओलांडणार्या परवानगी देणार नाही. या इंडस्ट्रीया पार्कला जास्तीत जास्त प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी याठिकाणी अनेक बागांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.

आपल्या सामाजिक जवाबदारीचा भाग म्हणून त्यांनी युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन तसेच पार्क अंतर्गत व बाहेर नोकरीसाठी मदत करण्यात येणार आहे. याशिवाय पार्कच्या आत एका शाळेची देखील स्थापना करण्यात येणार आहे. ज्याद्वारे गावातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण त्यांच्या गावात मिळेल.

शिरवळ हे ठिकाण पुणे-मुंबई व चैन्नई- बैगलोर महामार्गावर वसले असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. शिवाय पुणे किंवा मुंबई पेक्षा तुलनेने येथे जमिनी व अन्य सुविधांची किंमत देखील कमी असल्याने याठिकाणी विविध उद्योजक आकर्षित होत आहे. भविष्यात शिरवळ औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारूपास येईल हे नक्की