बालदिनी औचित्य साधून चिमुकल्याने ‘राजगड’ केला पंचेचाळीस मिनिटात सर.

669

पुणे प्रतिनिधी,

लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील याच विचाराने प्रेरित होऊन धनकवडी येथील भावार्थ दीपक शिळीमकर (वय 10 वर्षे ) या चिमुकल्याने बालदिनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला तसेच सर्वात उंच व अवघड राजगड किल्ला पंचेचाळीस मिनिटात न थांबता सर केला. (ता. १४) रात्री सात वाजता पायथ्याशी असलेल्या

गुंजवणे येथून राजगडावर चढाईस सुरवात केल्यानंतर अवघ्या पंचेचाळीस मिनिटात कोठेही न थांबता आणि न पाणी पिता तो रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी गडावर पोहोचला. राजगडावरील अवघड बालेकिल्लाही त्याने केवळ १० मिनिटांत पार केला.

भावार्थ हा सहकारनगर येथील ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातील विद्यार्थी असून, त्याचे वडील दीपक व आई वैशाली शिळीमकर हे दोघेही योग प्रशिक्षक आहेत.तसेच त्याचे वडील दीपक महाराज हे योग गुरू आहेत.

बालदिनी इतर मुले आपल्या आई- वडिलांकडे चित्रपट पहाणे, हॉटेलमध्ये खायला जाणे , बागेत फिरायला जाणे असा हट्ट करतात परंतु भावार्थ याने दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी राजगड सर करण्याचा निश्चय करून वडिलांकडे हट्ट केला. वडिलांनी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आनंददास यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील साधकांच्या साह्याने राजगड फक्त पंचेचाळीस मिनिटात सर करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तेथे फक्त वीस मिनिटे विश्रांती घेऊन भावार्थ याने राजगड फक्त चाळीस मिनिटात खाली देखील उतरून एक उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्याशी या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून लवकरच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ला याबद्दल माहिती कळविण्यात येणार असल्याचे सुधीर गरुड यांनी सांगितले.