आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आळंदी शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजात प्रभावीपणे काम करीत समाजसेवेचा वारसा जतन करना-या क्रियाशील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण विभागाचे विभागिय मॅनेजर जोरा सिह, शाखा प्रबंधक विजयेता शर्मा तसेच बँक कर्मचारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार मूर्ती आळंदी नगरपरिषद अध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका सुनीता रंधवे, के. के. हॉस्पिटलच्या डॉ वर्षा कुऱ्हाडे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ लता राजपूत, डॉ शुभांगी नरवाडे, डॉ विद्या कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. सागर, नियती फाउंडेशन च्या नियती शिंदे आदि महिलांना सन्मानित करण्यात आले.
मनसे तर्फे आळंदीत गुणवंतांचा सत्कार
जागतिक महिला दिनानिमित्त आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाबाई यांना अभिवादन करून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला आघाडी शहर सचिव शुभांगी यादव, उपसचिव कृपाली गायकवाड, माजी नगरसेविका श्रीमती उषा नरके, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे आदि उपस्थित होते. यावेळी वर्ल्ड मिडीया न्युज खेड तालुका अध्यक्ष पदी पल्लवी अरबट यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला..मल्टी टेक कंप्युटरच्या स्वाती थोरवे , आळंदी देवस्थांनचे माजी विश्वस्त स्वकाम सेवेचे संस्थापक डॉ. सारंग जोशी याचा कार्य गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला,पदाधिकारी यांना महिला दिना निमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रस्ते साधन, सुविधा व आस्थपना आळंदी शहर मनसे अध्यक्ष किरण नरके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेटे, संघटक पंढरीनाथ लेंढघर, प्रविण उगले, शहादेव गोरे, गणेश काकडे आदी उपस्थित होते.