पुरुष आयोग गठीत होण्यासाठी दिल्लीत 4 एप्रिलला जंतरमंतर वर एल्गार

430

पुणे / दिल्ली : काही स्त्रियांकडुन होणारा कायद्याचा गैरवापर तसेच भा.दं.वि कलम-498 ए, डोमेस्टिक व्हायलन्स अँक्ट, कलम-125 CRPC तसेच अन्य वैवाहिक कायद्यांचा होणारा दुरूपयोग ठाम्बविण्यासाठी त्याचप्रमाणे विवाहसंस्था वाचविणे आणि विवाहव्यवस्था टिकवणे, पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या ठाम्बविणे तसेच कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांची फरफट ठाम्बवण्या साठी राष्ट्रीय पुरूष आयोग आणि पुरूष मंत्रालयाय त्वरित स्थापन व्हावा याकरिता भारतातील पहीली नोंदणीकृत संस्था म्हणजे पुरूष हक्क संरक्षण समितीच्या माध्यामातून अँड संतोष शिंदे गेली 23 -24 वर्षे कार्यरत आहेत. त्यामुळे भारतातील सर्व संघटना व संस्थाना एकत्र आणून पुरूष आयोग त्वरित गठीत होणेकरिता अँड संतोष शिंदे महाराष्ट्रासह भारतभर फिरून जाग्रुती करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून पुरूष आयोग समन्वय समिती दिल्ली, सेव्ह इंडियन इनोसंट फेमिली, झर्खण्ड, आवाज हिंदुस्थान ट्रस्ट, पंजाब, पौरुष संस्था या व भारतातीलअन्य 10-15 संस्था मिळून येत्या 4 एप्रिल रोजी दिल्ली तील जंतर मंतर वर कोरोनाच्या नियमांचे पालन करून पुरूष आयोगाच्या मागणीसाठी श्री. संतोष शिंदे, श्री कपिल सक्सेना, श्री.रामनाथ दास, श्री.अक्षय धवन, श्री अशोक दशोरा, डॉ इंदू सुभाष, बरखा त्रेहान आदी परिश्रम घेत आहेत. ऍड संतोष शिंदे गेल्या 12-13 वर्षांपासून पुरुष आयोग तसेच पुरुष मंत्रालयाची स्थापना त्वरित व्हावी याकरिता प्रयत्न करीत असून त्याकरिता भारताच्या संसदेत याबाबत प्रश्न मांडून आवाज उठविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याकामी राज्यसभेच्या सेक्रेटरीएट तर्फे मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स कडे ऍड शिंदे यांची नियुक्ती होणे कामी प्रस्ताव पाठविला असून संपूर्ण भारतातील संस्थानी तसेच पीडित बंधू-भगिनींनी ऍड शिंदे यांची त्वरित नियुक्ती होणेबाबत आवाज बुलंद करावा असे आवाहन केले असून याकरिता मोबा नं- 7507004606 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन अँड संतोष शिंदे यांनी केले आहे.