काम संस्थेकडून गरजू कलाकारांना धान्य किट वाटप

474

आकाश जाधव, हडपसर
कराओके आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक या संस्थेच्या वतीने लाॅकडाऊन काळात गरजू कलाकारांना अन्नधान्याचे किट वाटप केले. जवळजवळ प्रत्येक किटमध्ये जास्तीत जास्त वस्तू देण्याचा संस्थेने प्रयत्न केला. संस्थेने आवाहन केल्याप्रमाणे अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली. त्यामध्ये प्रामुख्याने अॅड. अनिल तांबे, देवेंद्र भाट, डॉ. अमित वाळिंबे, सतीश ढवळे, अब्दुल अजीज कारचे ,नगरसेवक उमेश गायकवाड, किशोर धायरकर ,मोहन नारंग, रामदास भाऊ तुपे, राजेंद्र कांबळे डॉन, किरण देशमुख (एसीपी )मोहनदास, डॉ.प्रिती घोलप, पवन मित्तल ,श्रीकुमार काळे, सचिन (वर्धमान टाऊनशिप) सतीश महाशिकारे, दत्ता दळवी, शिवाजी जक्का, अर्चना नेणिकर, अॅड. विजयकुमार काळे, वैशाली मुळे, सुरेश धड, रुक्मिणी ताई भोसले, अर्चना पोळ, नवलकुमार काळे, अर्चना पावसकर, राजश्री कदम, सचिन येवले, महेश नाईक या दानशूर व्यक्तींनी वस्तू रुपी मदत केली.
दत्ता दळवी ,डॉ.अश्विनी शेंडे ,योगेश गोंधळे, अर्चना पोळ, मोहन नारंग यांच्या हस्ते जवळजवळ ९३ कराओके गायक, वादक व बॅक स्टेज आर्टिस्ट यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.
या किट वाटप कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष राजाभाऊ तिखे, उपाध्यक्ष रफिक मणियार, सेक्रेटरी दिलीप मोरे (सर ),खजिनदार सुरेश मिणेकर, रवि पिल्ले, रविंद्र कांबळे, राजेंद्र देसाई, अॅड. विजयकुमार काळे ,शैलेश घावटे, क्रांती शहा व गीतांजली जेधे यांनी केले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अजय खंडागळे, सतीश धेंडे, विजय हिंगणे ,रौफ शेख, व्हि. जी. पाटील, प्रमोद अय्या ,महेश मिणेकर व प्रथमेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.