केंद्रसरकार आणि राज्यसरकारच्या समन्वयातून नागरिकांसाठी लस उपलब्ध करावी : राजेंद्र भिंताडे

470

कोंढवा प्रतिनिधी,

गेले काही दिवस आणि खास करून मागील तीन दिवसापासून पुणे शहरातील लसीकरण संपुर्णत: बंद आहे. लस मिळविण्यासाठी नागरिक पहाटे चार किंवा पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर येत असून त्यांना सकाळी आठच्या सुमारास कळते कि आज लस उपलब्ध होणार नाही यामुळे नागरिकांना मोठ्या मानसिक त्रासला सामोरे जात असून वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने केंद्रसरकार आणि राज्यसरकारच्या समन्वयातून नागरिकांसाठी लस उपलब्ध करण्याची मागणी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी केली आहे.

आज संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगातील बहुतेक देशात लसीकरण पूर्ण झाल्याने ते देश कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. त्याच बरोबर आपला भारत देश सुद्धा लसीकरण मोठ्या प्रमाणावर करत आहे. पुण्यात देखील लसीकरणाचा वेग वाढलेला आहे, यामुळे पुण्यात कोरोना रुग्ण संख्या आता आटोक्यात आली आहे. परंतु गेली काही दिवस कमी प्रमाणात लसी उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परंतु गेली दोन ते दिवस पुणे पालिकेला लास उपलब्ध न झाल्याने लसीकरण पूर्णतः: बंद आहे. परंतु नागरिकांना याबद्दल माहिती नसल्याने ते लसीकरण केंद्रावर अजूनही गर्दी करत आहेत. पालिकेने लस कधी उपलब्ध होणार याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही. परंतु दोन्ही सरकारने नागरिकांसाठी त्वरित लस उपब्लध करावी , अन्यथा मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा राजेंद्र भिंताडे यांनी पत्रकाद्वारे सरकारला कळविला आहे