पत्रकारांशी उद्धट वर्तन करणार्‍या पोलीस उप-निरीक्षकास तात्काळ निलंबीत करा

658

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार
मल्हारी पाटील, डेरवली (पनवेल ):-
“पत्रकारिता” हा संविधानाचा म्हणजेच राजघटनेचा किंवा कॉन्स्टीट्यूशनचा चौथा स्तंभ.
आपला भारत देश संविधानावर चालतो. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी सादर झालं. एका संस्थेने केलेल्या विश्लेषणात असे लक्षात आले की भारतीय जनतेमध्ये फक्त 9% जणांना संविधान माहिती आहे. म्हणजेच 91% लोकांना संपूर्ण माहिती नाही किंवा अजिबातच माहिती नाही. हे आपले दुर्दैव आहे. यामुळेच आपल्या देशाची प्रगती जलद गतीने न होण्याचे मुख्य कारण असावे. फंडामेंटल राईटस् माहिती असल्याकारणाने संविधान कायदा आहे, देशाचा दस्तऐवज आहे, संस्कृती आहे.
या संविधानामध्ये चार स्तंभ करण्यात आले आहेत. 1) कायदे मंडळ, 2) कार्यकारी मंडळ, 3) न्यायपालिका आणि 4) पत्रकारिता म्हणजेच मिडीया. आणि याच आम्हा सर्वांच्या मुलभूत हक्कांचा “ पी.एस्.आय. दयानंद महाडेश्वर ” यांनी फार मोठा “अवमान” केला आहे.
पत्रकारितेचे काम, कायदे मंडळ जे कायदे बनवित आहे ते लोकांपर्यंत पोहोचविणे, कार्यकारी मंडळ आपले निर्णय बरोबर लागू करत आहे का ते लोकांच्या समोर आणण्याचे काम पत्रकरिता करते, तसेच न्यायपालिका आपले निर्णय देताना आपल्या मर्यादेमध्ये राहूनच आपले निर्णय देते का हेसुद्धा पाहण्याचे काम पत्रकारितेचे आहे. या तिघांचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेला संविधानाने दिले आहे. पत्रकारिता जनतेच्या बाजून हिताचे काम करते, पत्रकारितेच्या कामामुळे एक आदर्श देश, आदर्श समाज निर्माण करु शकते. या चौथ्या स्तंभामुळे लोकशाही टिकून आहे.
आणि पनवेलकरांचे दुर्दैव म्हणजेे दिनांक 20 मे 2021 रोजी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये मल्हारी पाटील यांचा पी.एस्.आय. दयानंद महाडेश्वर यांनी “ तुम्ही पत्रकार म्हणजे इथे काही वकीली करायला आले आहात का? पत्रकारांचे पोलीस स्टेशमध्ये काही काम नाही, तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर व्हा ” अशी वरच्या पट्टीत दटावणी केली. (म्हणजेच पी.एस्.आय. महाडेश्वर यांना संविधानाचा पूरता विसर पडला हे निश्चित!) त्यावेळी पत्रकार मल्हारी पाटील बाहेर गेले व थेट क्राईम पी. आय. गोपाळ कोळी सो. यांच्या केबीनमध्ये जाऊन सत्यघटना सांगीतली. तेव्हां कोळी साहेब यांनी पी.एस्.आय. महाडेश्वर यांना योग्य ती समज दिली तेव्हाच त्यांनी तक्रार लिहून घेतली.
आता फ्लॅशबॅक, दिनांक 20 मे 2021 रोजी एक महिला व तिच्या मुलीवर उरणनाका येथे अचानक झालेल्या जीवघेण्या हल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आल्या होत्या, पी.एस्.आय. महाडेश्वर त्यांची तक्रार काही केल्या घ्यायला तयार नव्हते, त्यांना संविधानाचा व नोकरीपूर्वी घेतलेल्या शपथीचा पूर्णपणे विसर पडला आहे. असे एखाद दुसर्‍या नियमबाह्य वागण्यार्‍या अधिकार्‍यांमुळे संपूर्ण पोलीस सर्कलला दोषी ठरवले जाते. पी.एस्.आय. महाडेश्वर हे तक्रार घ्यायला तयार नव्हते म्हणून त्यांनी पत्रकार मल्हारी पाटील यांची मदत मागितली, आणि म्हणूनच मल्हारी पाटील हे सहकार्याच्या भूमिकेमधून पनवेल शहर पोलीस स्टेशला गेले असता यांना पी.एस्.आय. महाडेश्वर यांनी संविधानाचा चौथ्या स्तंभाचा अवमान केला व पत्रकार मल्हारी पाटील यांना अपमानित करुन पोलीस स्टेशनच्या बाहेर जाण्याची दटावणी केली. गोपाळ कोळी साहेबांच्या सांगण्यावरुनच नंतर तक्रार दाखल केली. तक्रारदार महिला व तिच्या मुलीवर जीवघेणा हल्ला हा त्यांचाच दिर व त्याची पत्नी या दोघांनी मिळून उरणनाका येथे अचानक केला. हा हल्ला पूर्वनियोजीत असल्या कारणाने त्यांच्यावर सोबत आणलेल्या काठीने जबरी मारहाण केली. एका अबला स्त्रीवर हात उगारुन त्या महिलेच्या दिराने पुरषार्थ दाखविलाच आणि त्यांना सहकार्य पी.एस्.आय. महाडेश्वर हे तक्रार न घेता दाखवित होते. खरं तर जीवघेण्या हल्ल्याची एका स्त्रिची तक्रार त्वरित घेऊन त्यांनी लगोलग कारवाई करायला हवी होती.
कोळी  यांच्या सांगण्यावरुन तक्रार घेतली व त्या दोघींना मेडीकलसाठी पाठविले असता डॉक्टरांनीही कबूल केले आहे की दोघींना जबर मारहाण झाली आहे व त्या महिलेला हेड इंज्युरीमुळे ब्रेन सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी लेखी दिला आहे.
पोलीस आयुक्त यांना विनंती केली आहे की पी.एस्.आय. महाडेश्वर यांनी अंमलदार पदावर असताना कर्तव्यात कसुर केली आहे की, सिरीयस मॅटर असूनही तक्रार दाखल करुन घेतली नाही, कोळी  यांच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल केली तीही चुकिची म्हणजे या दोन्ही मायलेकींवर काठीने मारहाण केली गेली होती. डॉक्टरांनी हेड इंज्युरीमुळे ब्रेन सिटी स्कॅनचा सल्ला लेखी दिला आहे परंतू तक्रारीमध्ये हाताने मारहाण केल्याची खोटी नोंद करुन पूर्णपणे दिशाभूल केली आहे व साधी कलमं लावून एन.सी.आर. लिहीला आहे. पत्रकार मल्हारी पाटील हे साधारण दुपारी बारा-सव्वा बाराच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा केबीनमध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरामध्ये संविधानाचा व पत्रकाराचा केलेला अवमान व अपमान रेकॉर्ड झाला असणारच त्याचे शुटींग फूटेज् आपल्या कार्यालयामध्ये त्वरीत मागवून घेण्याची विनंती केली आहे व एक कॉपी संघटनेनेही मागीतली आहे. पत्रकार किती तळमळीने काम करत असतात व पी.एस्.आय. महाडेश्वर किती अयोग्य काम करत आहेत हे सर्व पनवेल शहर पोलीस स्टेशच्याच सीसी टीव्ही कॅमेरमध्येच मिळून जाईल. खोटी तक्रार नोंदवून घेतली आहे हे मेडीकल रिपोर्टवरुन आपल्या लक्षात आलेच आहे की पी.एस्.आय. महाडेश्वर किती अयोग्य काम करत आहेत हे अपोआपच सिद्ध होईल.
पत्रकाराशी अपमानास्पद वागणूक, संविधानच्या अत्यंत महत्वाचा चौथ्या स्तंभाचा अवमान, मेडीकल रिपोर्टच्या आधार घेऊन दाखल केलेली खोटी तक्रार व सीसीटीव्ही फुटेज्च्या आधारे सर्वकाही मा. आयुक्त सो. हे सहज सिद्ध करु शकता की अश्या अयोग्य, उद्धट, उर्मट, नियमबाह्य काम करणार्‍या अधिकार्‍यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याला दोषी समजले जाते. त्यामुळे पी.एस्.आय. महाडेश्वर यांना त्वरित इंक्वायरी सस्पेंड करुन त्यांची खोलवर चौकशी व्हावी. चौकशी होईपर्यंत पी.एस्.आय. महाडेश्वर यांची वेतनश्रेणी, सर्व भत्ते थांबविण्यात यावेत व त्यांची पनवेल शहर पोलीस स्टेशमधूनही बदली करण्यात यावी, पुढील आठ ते दहा वर्षे त्यांची प्रमोशन्स थांबविण्यात यावीत. या केसच्या चौकशीसाठी आय.पी.एस्. किंवा एम्.पी.एस्.सी. कॉलीफाईड क्लास वन ऑफिसरची नेमणूक करण्यात यावी. मा. आयुक्त सो. यांना संविधानाचा अवमान करणे हा विषय आपणाकडून लाईटली घेण्यात येऊ नये विनंती करण्यात आली आहे. जेणेकरुन इतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना जरब बसेल व संविधानाचा अवमान व संविधानाचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारितेचा अवमान व अपमान करण्याचे धाडस कोणीही करणार करणार नाही.
विषय संविधानाचा असल्याकारणाने कळकळीची नम्र विनंती करण्यात आली आहे की मा. आयुक्त सो. यांनी स्वत: जातीने लक्ष घालून पी.एस्.आय. महाडेश्वर यांना निलंबीत करतील अशी अपेक्षा करण्यात आली आहे