आळंदी नगरपरिषद कामगारांना आरोग्य किटचे वाटप

649

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :

येथील आळंदी नगरपरिषद हद्दीत कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर यांनी प्रामाणिक पणाने काम केले आहे.या कामगारांचे आरोग्य सुरक्षेचा विचार करून सर्व कर्मचारी यांना रोगप्रतिकार शक्ती वर्धक किटचे वाटप आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमर्गेकर यांनी स्वखर्चाने केले.यात नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी यांना रोगप्रतिकार शक्ती वर्धक आरोग्य किटचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
यावेळी नगरसेविका रुख्मिणी कांबळे,माजी नगरसेवक अशोक उमर्गेकर, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकसे, लेखापाल देवश्री कुदळे, करर्निरिक्षक रामराव खरात, मनोज राठोड आळंदी नगरपरिषद विविध विभाग प्रमुख, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गेल्या १६ महिन्या पासून आळंदी नगरपरिषद कर्मचारी कोरोना या महामारीचे काळात सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी काम करीत आहेत.कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहिल्यास आळंदीचे सेवा सुविधा कायम सुरू राहतील.कामगारांची रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी त्यांचे आरोग्य , सुरक्षा याचा विचार करून सर्व कामगारांना आरोग्य किट वाटप करीत असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.यावेळी उपक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक अशोक उमरर्गेकर यांनी केले.
यातून कामगारांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या आहार किटचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व कामगारांचे तसेच त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहावे निरोगी राहावे व सर्वांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जपत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यानी सांगितले.सुरू केला आहे.