पुणे प्रतिनिधी,
कोरोना आणि लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणि पर्यटकांना शनिवारी शासनाने सुखद धक्का दिला. कोरोना चा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने टप्प्याटप्याने अनलॉक ची प्रक्रिया सुरु केरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात आता पर्यटनास बहर येणार आहे.
मागील वर्षी आणि यावर्षीही कोरोना महामारीमुळे घरी राहुन त्रस्त झालेल्या पर्यटकांना आणि लहानथोरांना आता मनमोकळं पर्यटन करता येणार आहे. मागिल 3 ते 4 महीन्यांपासुन कोरोनाचा प्रकोप वाढल्याने आधी संचारबंदी आणि मग लॉकडाऊन सुरु झाल्याने पर्यटन बंद होते. पर्यटन स्थळे पर्यटकांविना सुनी पडली होती.
सध्या राज्यात मान्सुनचे आगमन झालेमुळे सर्वत्र निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचं मनमोहक रुप मनात साठविण्यासाठी, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटक आसुलेले आहेत. या सर्व पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटकांना पर्यटनाचा निखळ आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आपली सर्व पर्यटक निवासे सज्ज केली आहेत.
या लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरुण कर्मचारी यांचा मेळ साधत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची संकल्पना ही महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मा. आशुतोष सलील (भा.प्र.से.) यांची होती. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सदरच्या प्रशिक्षणाबाबत सर्वतोपरी महत्त्वाची भुमिका बजावली. सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापुर यांच्या वतीने उपमहाव्यवस्थापक मा. चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे.. सदरच्या कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत Front Office Management, House Keeping आणि Food and Beverages याबरोबरच Attitude based Training आणि Pandamic Based Training सह प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, सव्त:ची स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकिकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याचा समावेश सदरच्या प्रशिक्षणामध्ये करण्यात आला होता. तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक याद्वारे दोन आठवडयाच्या या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सदरच्या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असुन पर्यटकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे अनलॉक नंतर पर्यटक मोठया प्रमाणावर पर्यटनास निघणार आहेत. आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येणार आहे. त्यामुळे आगामी पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.
मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी करण्यात येत असुन पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदीक काढा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सर्वच पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.
“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासे सुरु झाली असुन www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार आहेत. सदर बाबतची माहीती महामंडळाच्या वेबसाईवर दर्शविण्यात आली आहे. तसेच पर्यटकांसाठी नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र कोरोना महामारी बाबतची खबरदारी घेवुन आणि निसर्गाचे भान राखुन आगामी काळात बिनधास्त पर्यटन करता येणार आहे.”
श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे