पनवेल महापालिकेची खारघरमधील बोगस डॉक्टरवर कारवाई

531

गिरीश भोपी, पनवेल

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालये व खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना सतर्कतेचा इशारा आहे, त्यांनी आपल्या रुग्णालयातील डॉक्टरर्सचे मूळ प्रमाणपत्र तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या बनावट डॉक्टरवर कडक कारवाई केली जाईल. विनाकारण त्या रूग्णालयालाही त्रास होऊ शकतो. यापुढे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असे बनावट डॉक्टर आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या आहेत.

– श्री.सुधाकर देशमुख, आयुक्त ,पनवेल महानगरपालिक

पनवेल, दि.22 : खारघर मधील सेक्टर पंधरा येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवरती पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ.सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडण्यात आले.

खारघर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशन करून बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली.

सदर डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांमध्ये या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुढे अशा कारवाईमध्ये पोलिस विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेस मदत करण्याचे आश्वासन यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिले

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालये व खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना सतर्कतेचा इशारा आहे, त्यांनी आपल्या रुग्णालयातील डॉक्टरर्सचे मूळ प्रमाणपत्र तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या बनावट डॉक्टरवर कडक कारवाई केली जाईल. विनाकारण त्या रूग्णालयालाही त्रास होऊ शकतो. यापुढे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असे बनावट डॉक्टर आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या आहेत.

– श्री.सुधाकर देशमुख, आयुक्त ,पनवेल महानगरपालिका