संतोष गोरड, पुणे
सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त उंड्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समाजसेवक राजेंद्र भिंताडे यांनी
छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राबविली. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा पायाही घातला’, असे प्रतिपादन भिंताडे यांनी केले. तसेच
शाहू महाराजांचे आचार विचार अंगीकृत करून एक सुशिक्षित समाज निर्माण करूयात असे मत देखील व्यक्त केले.या कार्यक्रमाला समाजसेवक राजेंद्रजी भिंताडे, मुख्याध्यापक मिलिंद थोरात, उपशिक्षक माधव शिंदे, सुजाता शहा, दादा कड, अविनाश टकले,
ओंकार होले, अक्षय फुलावरे, कैलास पुणेकर, सुरेखा नागवडे, अर्चना राजेंद्र कुंभारकर, सीमा आदलिंगे, पुनम वेदपाठक, वैशाली वाघ, व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना चे सर्व नियम पाळून जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.