उंड्रीत ४०० बांबूच्या झाडांचे वृक्षारोपण सोहळा संपन्न

450

कोंढवा प्रतिनिधी,
उंड्रीतील भिंताडे नगर ते पॅलेस आर्चीड या रस्त्याच्या बाजूला हिल्स अँड डेल्स सोसायटी व जनसेवक राजेंद्र भिंताडे आणि आंनदवन मित्र मंडळ यांच्या वतीने ४०० बांबूच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
उंड्रीतील भिंताडे नगर ते पॅलेस आर्चीड या रस्त्याच्या बाजूला नागरिक कचरा टाकत असत. यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.तसेच पावसामुळे येथे गवत देखील मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे परिसरात कीटक मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांनी रस्त्याच्या कडेचा भाग पुणे मनपाच्या जेसीबी साह्याने स्वछ करून घेतला. तसेच त्वरित या ठिकाणी ४०० बांबूच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उंड्री
परिसर स्वच्छ व ग्रीन करण्याचा संकल्प केला आहे,असे भिंताडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रवीण कुमार, भुपेश शर्मा, विशाल पवार, रमेश वरयानी , जयश्री गणेश, समीप मुथा, डॉ. अश्विन खिलारे, आंनदवन मित्र मंडळाचे सभासद, शशिकांत पुणेकर, दादा कड, अविनाश टकले,ओंकार होले,अक्षय टकले, हनुमंत घुले तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे, लालचंद भिंताडे आदी उपस्थित होते.