पुणे कोरोना अपडेट्स
पुणे कोरोना अपडेट : गुरूवार दि. ०५ ऑगस्ट, २०२१
दिवसभरात नवे २४४ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने २४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८८ हजार २९३ इतकी झाली आहे.
दिवसभरात १३९ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील १३९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७७ हजार ०४८ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !
दिवसभरात ८ हजार ४६९ टेस्ट !
पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ४६९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख १७ हजार ३४० इतकी झाली आहे.
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या २०९ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ४४८ रुग्णांपैकी २०९ रुग्ण गंभीर तर ३६१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
नव्याने ५ मृत्युंची नोंद !
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७९७ इतकी झाली आहे.
◆ उपचार सुरु : २,४४८
◆ नवे रुग्ण : २४४ (४,८८,२९९)
◆ डिस्चार्ज : १३९ (४,७७,०४८)
◆ चाचण्या : ८,४६९ (२९,१७,३४०)
◆ मृत्यू : ५ (८,७९७)