उंड्री गावच्या नागरी विकास कामांकरिता 1 कोटी रुपयांचा निधी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी केला जाहीर
पुणे प्रतिनिधी
पुणे महानगर पालिकेत नव्यानं समाविष्ठ झालेल्या गावांमध्ये नागरी विकास कामे मोठया प्रमाणावर भाजपा राबवणार असल्याचे प्रतिपादन उंड्री गावचे प्रभारी भाजपा माजी सभागृह नेता, नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी उंडरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
भाजप नेते जनसेवक राजेंद्र भिंताडे,अविनाश टकले,दादा कड,ओंकार होले,हनुमंत घुले यांनी पूरग्रस्तांना मदत,कोव्हिडं योद्धा सन्मान,मनपा कर्मचारी,माजी सैनिक,निवृत्त पोलीस सन्मान, रिक्षाचालकाना सीएनजी कुपन वाटप,जेष्ठ ग्रामस्थ,10 वि 12 वि उत्तीर्ण विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार,गरजू कुटुंबांना किराणा वाटप आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी सर्वांना सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भिमाले हे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, योगगुरू दीपकजी शिळीमकर, दादा कड, अक्षय टकले, जयश्री पुणेकर,भाजप डॉक्टर सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ तेजस्विनी अरविंद,प्रकाश होले,विजय चौधरी,कैलास पुणेकर,अनिल होले,दत्तोबा होले आदी मान्यवर आणि जेष्ठ ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाजप कार्यकर्त्यांनी उंडरी गावच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले असून उंड्री गावात विविध विकास कामाकरिता 1 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे यावेळी श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
माजी आमदार योगेश टिळेकर यावेळी बोलताना म्हणाले ‘ नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आघाडी सरकारच्या सत्ताधाऱ्यानी नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न न केल्याने या गावांचा विकास खुंटला आहे, भाजप या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांना निधी उपलब्ध करून देत असल्याने या गावांचा चेहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले ‘ उंड्री गावात शहरीकरण वेगाने वाढत असून पाणी,ड्रेनेज, रस्ते आदी समस्या सोडवण्यात स्थानिक सत्ताधार्यांना अपयश आले आहे,आता पुणे मनपात समावेश झाल्याने हे प्रश्न भाजपच्या माध्यमातून सुटतील आणि उंडरी परिसराचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकांत भिंताडे,सचिन भिंताडे,तुषार भिंताडे,भानुदास होले,विठ्ठल भिंताडे,निलेश भिंताडे, जालिंदर कामठे,संकेत भिंताडे,अरुण आंबेकर, प्रकाश आबनावे,
काशिनाथ कड आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पुणेकर यांनी केले तर आभार गौरी फुलावरे यांनी मानले.