Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकला परिवार हडपसर कडून महाड पूरग्रस्तांना मदत

कला परिवार हडपसर कडून महाड पूरग्रस्तांना मदत

आकाश जाधव प्रतिनिधी
कला परिवार हडपसर या संस्थेच्या वतीने पूरग्रस्त महाड परिसरातील काही गावांना जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करण्यात आली. कला परिवार हडपसर च्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा टेम्पो पाठवण्यात आला. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ समारंभ आयोजन समिती सदस्य दत्ता दळवी, हडपसर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे यांच्या हस्ते नारळ फोडून मदतीचा टेम्पो पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आला .यावेळी कला परिवार हडपसर चे सदस्य अजय खंडागळे, संगीता बोराटे ,अश्विनी सुपेकर हे उपस्थित होते
महाड तालुक्यातील बिरवाडी येथे प्रिया सपकाळ, डॉ. राजेश शिंदे ,डॉ. नितीन देशमुख व संपत खराडे यांनी तिथे मदतीचे वितरण करण्यासाठी कला परिवार हडपसरला सहकार्य केले. त्यानंतर कसबे शिवथर घळ व कुंभे शिवथर घळ येथे सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. तेथील सर्व गावकरी एका मंदिरात एकत्र गोळा झाले होते. तेथील छोट्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मितेश सपकाळ यांनी केले. कला परिवार हडपसर चे अध्यक्ष दिलीप मोरे व संचालक आकाश जाधव, सदस्य योगेश कुंभार यांचा पोलीस पाटील मारुती सपकाळ व लक्ष्मण सपकाळ यांच्या हस्ते मदतीबद्दल सन्मान करण्यात आला. तीनही ठिकाणी कार्यक्रमात तेथील स्थानिक कार्यकर्ते संपत खराडे यांनी कला परिवार हडपसरला विशेष सहकार्य केले.
पूरग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्यासाठी अजय खंडागळे, संगीता बोराटे, रऊफ शेख, प्रमोद अय्या, खंडेराव जगताप, योगेश गोंधळे, नंदू जगताप, अश्विनी सुपेकर ,राणी साठे, काजल माने, श्रुतिका शिरसागर, निकिता यादव, वनिता गायकवाड, अजित सावंत यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!