गिरीश भोपी, पनवेल
15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनीचे औचित्य साधत करंजाडे येथील सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने कोरोना काळात सामाजिक सेवा त्याचबरोबर संकटातही आपलं कुटुंब आणि आपलं आरोग्य धोक्यात घालत आपलं कर्तव्य बजावून उल्लेखनीय कामगिरीमुळे पनवेल शहर वाहतूक शाखेचे महिला पोलीस शिपाई साधना पवार यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सन्मानपत्रामुळे त्याचे पोलीस, सामाजिक, शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. कोरोनाच्या आधीही अनेक संकटकाळी त्यांनी नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या कार्याने अनेकदा सामान्यांचे जीवन सावरले आहे. त्यांचे पोलीस सेवेमध्ये महत्वपूर्ण काम आहे. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.