उंड्री-भिंताडेनगरमधील ईगल डोअर्स कारखाण्याला मोठी आग ; कारखाण्याचे वीस लाखांचे नुकसान

345

कोंढवा प्रतिनिधी

उंड्री- भिंताडे नगर होले वस्ती सर्व्हे नं ७ येथील “ईगल डोअर्स” या पीव्हीसी दरवाजे बनवायच्या कारखाण्याला शॉर्ट सर्किट मुळे मोठी आग लागली असून यामध्ये कारखान्याचे अंदाजे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले असून यामध्ये एका टाटा एस या टेम्पोचा हि समावेश आहे.

याबाबत कारखान्याचे मालक मनोज कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार असल्याने कारखान्याला सुट्टी होती. यामुळे कारखान्यामध्ये कोणीही नव्हते. कारखान्यात पीव्हीसी दरवाजे बनवायचे काम होत होते . आतमध्ये दरवाजे बनवायचा कच्चा माल आणि पक्क्का माल देखील होता. कामगारांनी एक टेम्पो आतमध्ये लावला होता तो सुद्धा आगीच्या भक्षस्थानी गेला यामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारखान्यात कोणीही नसल्याने जीवित हानी टळली असून नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. आग लागतातच येथील जनसेवक राजेंद्र भिंताडे व अमोल कामठे यांनी त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवल्याने कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले आहे. यावेळी पुणे मनपाचे अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख, राहुल बांदल, गणपत पढे , अनिमिष कोंडगेकर , अभिजित थळकर , संदीप जगताप यांनी हि कामगिरी केली. याप्रसंगी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली गुन्हे पी आय शब्बीर सय्यद, सहा.पो.नि. स्वराज पाटील , पो.शिपाई अभंग, नगरे,पानाडे यांनी बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.