पुणे प्रतिनिधी,
नागरिक अधिकार मंचच्या नेतूरत्वाखाली पारगे नगर ,पोकळे मळा येथील राहिवाशांच्या वतीने 20 मीटर डीपी रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा यासाठी मोर्चा काढत पारगे नगर भागात आंदोलन करण्यात आले . सदर आंदोलन समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सदर स न 38 व 37 पारगे नगर या ठिकाणी 20 मीटर डीपी रोड असून सदर डीपी रोड बांधकाम व्यवसाईक कडून पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. सदर डीपी रस्ता हा 2004 साली पुणे मनपाच्या ताब्यात आला असून आज पर्यंत पुणे मनपाने नागरिकांसाठी खुला केलेला नाही.त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता बंद असल्यामुळे परिसरात बेकायदेशीर जमाव असतो त्याच प्रमाणे कौसर बाग बायपास ते कोंढवा बुद्रुक पर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रश्न यानिमित्ताने सुटेल. परिणामी कोंढवा सासवड मुख्य रस्त्याचा ताण या मुळे कमी होणार .पुणे मनपाला वारंवार विनंती करून देखील पुणे मनपा कडून या रस्त्याला दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिक अधिकार मंचच्या अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतृत्वात आणि स्थानिक राहिवाशांच्या वतीने पारगे नगर डीपी रोड समोर मोर्चा काढण्यात आला. येत्या 15 दिवसात जर हा रस्ता खुला करण्यात आला नाही तर स्थानिक राहिवशांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील पालिकेला देण्यात आला.
याप्रसंगी कुमार सुरक्षा सोसायटी ,कुमार संसार,यश रिधम,कुमार सबलाईम ,होम वूड , डीएसके गार्डन,कुमार पामग्रूव, अल्ककॉन रॉईस , साई एनकलेव्ह ,आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.