Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीआपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत हे जीएसटीचे उत्साहवर्धक संकलन दर्शविते :...

आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत हे जीएसटीचे उत्साहवर्धक संकलन दर्शविते : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड

अपेक्षित 1लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा करसंकलनापेक्षा आता  1.30 लाख रुपयांचे जीएसटीसंकलन होंताना दिसत आहे, यावरून आपण आर्थिकपुनर्प्राप्तीच्या  मार्गावर आहोत, हे दिसून येते.आर्थिकसमावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटलव्यवहार या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचासल्ला पंतप्रधानांनी दिला आहे, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री भागवत कराड यांनी पुण्यातसांगितले.महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना  (एमटीपीए), अखिल भारतीय कर व्यावयिक महासंघ  (एआयएफटीपी), महाराष्ट्र वस्तू आणि सेवा करव्यावसायिक संघटना  (जीएसटीपीएएम) आणि उत्तरमहाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना  (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित  दोनदिवसीय राष्ट्रीय कर परिषदेमध्ये ते बोलत होते. 

मंत्री म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याचीशक्यता नसली तरी कोविडपासून प्रतिबंधासाठीसावधगिरी बाळगली पाहिजे.  या परिषदेत वस्तू आणिसेवा कर  अंतर्गत अपील, प्राप्तिकराचे फेसलेसनिर्धारण यांसारख्या अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यातआली. अशी परिषद नियमितपणे आयोजित करणे हीएक स्वागतार्ह पद्धत आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीकराड यांनी सांगितले.

 “करदाते हे राष्ट्रनिर्माते आहेत” हे .आपले  माजीराष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अगदीबरोबर म्हटले आहे. 7 वर्षांपूर्वी 17 लाख कोटींचारुपयांचा असलेला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपटीनेवाढला आहे आणि प्रामाणिक करदात्यांमुळेच हे शक्यझाले. आणि कर व्यावसायिक हे अनुपालनासाठीमुख्य प्रेरक आहेत, असे श्री. कराड यांनी सांगितले.

श्री. कराड पुढे म्हणाले की, चार वर्षांपूर्वी जेव्हा वस्तूआणि सेवा कर  लागू करण्यात आला तेव्हा त्याच्यारचनेत काही त्रुटी होत्या. पण हळूहळू करव्यावसायिकांचे  अभिप्राय आणि सूचनांमुळे यासमस्या दूर केल्या जात आहेत.  नव भारत आरोग्य,  संपदा , पायाभूत सुविधा ह्यांनी परिपूर्ण असेल आणिवित्त या प्रक्रियेचा  महत्वाचा भाग आहे. आणि करसंकलनात पारदर्शकता आणणारी स्वच्छ आणि स्पष्टव्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

यावेळी सीए योगेश इंगळे लिखित ‘जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित ‘जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ वसीए वैशाली खर्डे लिखित ‘अ प्रॅक्टिकल गाईड ऑनजीएसटी ऍक्ट’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराडयांच्या हस्ते झाले.

यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष श्री. सतीश मगर, एमटीपीएचेचेअरमन  श्री. नरेंद्र सोनवणे, एआयएफटीपीचे श्री.  श्रीनिवास राव, एमटीपीएचे अध्यक्ष श्री. मनोजचितळीकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!