पुणे, दि. 14 नोव्हेंबर: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साज-या केल्या जाणा-या बालदिनाचे औचित्य साधून पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांच्यावतीने नवी पेठ परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनाचे महत्व आणि पं. नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन लहान मुले आणि मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहानमुलांना गुलाबाचे फुल आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच आकाशामध्ये फुगे सोडून मुलांनी शांतीचा संदेश दिला.
तसेच आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रभागातील सुभाष तोंडे आणि मारुती नाना निकम यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील ठोसरपागा स्मशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष सोनालीताई मारणे, माजी नगरसेविका नीताताई परदेशी, पं. जवाहरलाल नेहरु स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, साहिल केदारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मच्छिंद्र उत्तेकर, शिवसेनेचे अनंत घरत उपस्थित होते. श्रीमती स्मिता सुभाष तोंडे आणि कमल मारुती निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभाग क्र. २९ मधील जेष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.