Homeताज्या घडामोडीकोरोनाच्या एकुण 5 रूग्णांवर उपचार सुरू- जिल्हाधिकारी राम

कोरोनाच्या एकुण 5 रूग्णांवर उपचार सुरू- जिल्हाधिकारी राम

पुणे प्रतिनिधी,

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी
म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी व सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण जरी आढळून आले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

rouspolisthis1975 on Home
conchybason1979 on Home