गुरूनानक देवजी “उद्यानाचे तसेच ४.५ किमीचा महत्त्वकांक्षी जलवाहिनीचा अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण ..

528

गणेश जाधव, कोंढवा 

 नगरसेविका नंदाताई नारायणराव लोणकर यांच्या अथक प्रयत्नातून शिख धर्माचे पहिले गुरु “गुरुनानक देवजी “यांच्या नावाने उद्यानाचे तसेच सततच्या पाठपुरव्याने ४.५ कि.मीचा महत्वाकांक्षी जलवाहिनीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नाचे निराकरण करण्यास अखेर यश आले. सततच्या पाठपुराव्याने ४.५ कि.मीचा महत्वाकांक्षी जलवाहिनीचा प्रकल्प एन.आय.बी.एम , कौसर बाग ,उंड्री रोड या भागात यशस्वीरित्या करण्यात आला .आज खऱ्या अर्थाने हा परिसर टँकर मुक्त होण्याकडे वाटचालीस सुरवात झाली.

सदरच्या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहळ ,हडपसर विधानसभा मतदार संघाचे  आमदार चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेत्या   दीपली धुमाळ,  प्रकाशसिंह घई, नगरसेवक   प्रशांत जगताप , बंडू तात्या गायकवाड, नगरसेवक  गफुर पठाण, योगेश ससाणे , निलेश मगर , प्रकाश कदम, अमृता बाबर, अश्विनी भागवत, प्रिया गदादे, स्मिता कोंढरे, राजलक्ष्मी भोसले, रत्नप्रभा जगताप,  अशोक कांबळे, नगरसेवक महेंद्र पठारे , हमीदा सुंडके, नगरसेविका  परवीन हाजी फिरोज शेख,  हासिना ईनामदार, मा. नगरसेविका मेघाताई बाबर , चंद्रकांत कवडे,  राकेश कामठे,  मनाली भिलारे , भोलासिंह अरोरा,   राजेंद्रशेठ भिंताडे,  पंढरीनाथ लोणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन  नारायणराव लोणकर (अध्यक्ष हडपसर विधान सभा मतदार संघ) , स्वीकृत नगरसेवक  संजय लोणकर,  अजितदादा लोणकर, राहुल लोणकर,  युवराज लोणकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले तसेच या कार्यक्रमाला कोंढवा खुर्दचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.