गणेश जाधव, पुणे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर यांचा शिक्षकांच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा…
पुणे महानगरपालिकेतील प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर यांच्यावतीने पालिका प्रशासनास आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आले. शिक्षण विभाग कार्यालय ते मनपा भवन ,पुणे असा मार्ग हा आक्रोश मोर्चा साठी नियमित करण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते कार्यकारी राज्याध्यक्ष सचिन डिंबळे यांनी केले . या मोर्चास संघटनेचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आक्रोश मोर्चाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले शेकडो प्राथमिक शिक्षकांचा सहभाग होता .सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने मोर्चाला पाठिंबा देऊन आपले प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला..
शिक्षक संघटनेच्या प्रलंबित प्रश्न पुढील प्रमाणे:-
१)सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व हप्ते अदा करणे.
२)सर्व माध्यम मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदोन्नती मिळणे.
३)इंग्रजी व मराठी माध्यम पदवीधर पदोन्नती मिळणे
सर्व माध्यम वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करणे.
४/कोविड काळातील पगार कपातीचा फरक त्वरित अदा करणे.
५)चित्रकला व संगीत शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणी चा फरक अदा करणे.
६)सर्व माध्यमांच्या शिक्षकांच्या विनंती बदल्या याबाबत विचार करणे.
७)रजा मुदतीत अली शिक्षण सेवकांना कायम करणे.
८)सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोगानुसार पेन्शन मिळणे.
या आक्रोश मोर्चा करिता पुणे महानगरपालिकेतील अनेक विद्यमान नगरसेवकांनी पाठिंबा दिला व सदर मोर्चा स्थळी हजर राहून शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांची मागणी रास्त असून ती मान्य होणे अतिशय जरुरीचे आहे असे मत देखील विद्यमान नगरसेवकांनी व्यक्त केले..
पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , प्राथमिक शिक्षण विभागाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, हाजी गफूर पठाण (नगरसेवक )हे देखील आक्रोश मोर्चाला उपस्थित होते. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावेत व त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा या सार्थ भावनेने आपण सर्वजण आलात याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे शहर अध्यक्ष रवींद्र सातकर यांनी आभार व्यक्त केले..