कोंढव्यातील डीपी रस्त्याच्या कामासाठी नागरिक अधिकार मंचचे आंदोलन

1040

कोंढवा प्रतिनिधी, 

प्रभाग क्रमांक 26 कोंढवा खुर्द, कौसर बाग लाईफलाईन हॉस्पिटल समोरील रस्त्याचे काम मागील 25 दिवसांपासून अर्धवट अवस्थेत बंद पडले असून रस्त्याचं काम ताबडतोब सुरू करण्यात यावं म्हणून नागरीक अधिकार मंचच्या अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतृत्त्वामध्ये  कोंढव्यातील नागरीकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

     कोंढवा कौसर बाग येथील दोन डीपी रोडला जोडणारा हा रस्ता आहे. सदर ठिकाणी जास्त प्रमाणावर रहदारी असते . पुणे महानगरपालिका तर्फे  याठिकाणी नोव्हेंबर मध्ये मोठा गाजावाजा करून रस्त्याचे कामाचे उदघाटन करून काम चालू करण्यात आलं होतं , परंतु रस्त्याचे काम अर्धवटच करून अर्धा रस्ता तसाच खरडून ठेवला आहे आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याठिकाणी फिरकले सुद्दा नाही. सदर ठिकाणी रस्त्यावर राडारोडा पडलेला असून ड्रेनेजचे झाकण वर खाली झाल्याने अपघात घडत आहे. याठिकाणी हॉस्पिटल,शाळा असून लहान मुलं महिला जेष्ठ नागरिकाचा वावर जास्त प्रमाणात आहे.पुणे मनपाला वारंवार विनंती करून देखील या ठिकाणी पुणे मनपा कडून सरासर दुर्लक्ष होत आहे म्हणून   रस्त्याचे काम का पूर्ण का करण्यात येत नाहीये असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या  व नागरिक अधिकार  मंचच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले .येत्या चार दिवसात सदर ठिकाणी जर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही तर नागरिक अधिकार मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी पुणे मनपास दिला आहे .