पुणे (प्रतिनिधी) आपल्या अलिबागच्या एका पंच तारांकित हॉटेल मधील मुक्कामात
येथील उद्योजक अमित शहा यांना हॉटेल व्यवस्थापनाने योग्य वागणूक दिली नाही तसेच त्यांच्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आल्याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा हिरमोड झाल्याने
अमित शहा यांनी थेट ग्राहक न्यायालयात धाव घेऊन हॉटेल रेडीसन ब्यू & स्पा विरुद्ध केस ठोकली आहे.
काही दिवसापूर्वी अमित शहा हे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते सपत्नीक
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे गेले होते तिथे त्यांनी हॉटेल रेडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये
मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांना हा अनुभव आला.
.अमित शहा यांनी दोन रात्री आणि तीन दिवसासाठी ८२ हजार ६०० रुपयांचे हॉटेलचे पॅकेज घेतले होते .
हॉटेल मध्ये त्यांना मिळालेली रूम अस्वच्छ व व्यवस्थित नव्हती. याबद्दल हॉटेल व्यवस्थापनाकडे त्यांनी
रीतसर तक्रार केली तेव्हा त्यांना दुसरी रूम देण्यात आली परंतु कर्मचाऱ्यांनी दिलेली दुसरी रूम सुद्धा व्यवस्थित नव्ह्ती , पण पॅकेजचे पैसे शहा यांनी आगाऊ भरले होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांना त्याच हॉटेल मध्ये मुक्काम करावा लागला .
त्यानंतर अमित शहा रात्री जेवणासाठी गेले असता जेवणामध्ये झुरळ आढळून आल्याने त्यांनी लगेच हॉटेल मॅनेजर ला तक्रार केली ,जेवणात झुरळ पाहून त्यांची जेवणाची इच्छा मेली , नाईलाजाने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना उपाशीच राहावे लागले , त्यानंतर एनिवर्सरी चा आनंद लुटण्यासाठी आलेल्या नाराज अमित शाह यांनी हॉटेल विरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय केला .
जेवणाच्या ताटातील झुरळ, हॉटेल मधील अस्वच्छता आणी हॉटेल व्यवस्थापनाची असभ्य वर्तणूक यामुळे वैतागलेल्या अमित शहा यांनी लगेच
ग्राहक तक्रार निवारण मंच आणि अलिबागच्या अन्न व औषध प्रशासनाकडे रीतसर तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
पुणे येथील ग्राहक न्यायालयात शहा यांनी झालेल्या मनस्तापाबद्दल नुकसान भरपाईसाठी तसेच हॉटेल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दावा दाखल केला असून त्याचे वकील म्हणून सत्यजीत कराळे पाटील हे काम पाहत आहेत . तसेच त्यांना अँँड मंगेश कटके आणि ओंकार चौधरी हे सहकार्य करीत आहेत