Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेआळंदीला पाणी पुरवठ्यास टँपीगला परवानगी :- नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर

आळंदीला पाणी पुरवठ्यास टँपीगला परवानगी :- नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर

आळंदी नागरिकांत समाधान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीत येणाऱ्या भाविक,नागरिकांच्या साठी शुद्ध पाणी पूणथ व्हावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुणे मनपाच्या कुरुळी येथील जलशुद्धीकरण केद्रांतुन घेण्यासाठी टँपीग करण्यास आळंदी नगरपरिषदेला परवानगी मिळाली असल्याने आळंदीला पाणी मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.
या संदर्भात पुणे महापालिका आयुक्तांस संबंधित विभागाने दिलेले पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना दिले आहे. यावेळी भाजप आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय घुंडरे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजपचे जेष्ठ नेते पांडुरंग ठाकुर आदी उपस्थित होते.
आळंदीकर नागरिक आणि भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा संकल्प व आश्वासन भाजपचे वतीने गेल्या निवडणुकीत देण्यात आले होते. त्या प्रमाणे उर्वरित टँपिंगचे काम जलद गतीने पूर्ण करून नियमित व पुरेशा दाबाने, शुद्ध पाणी पुरवठा आळंदीकर नागरिक व भाविकांना लवकरच होणार असल्याचे नगराध्यक्षा उमरगेकर यांनी सांगितले. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा व प्रशासकीय काम करण्यासाठी विशेष सहकार्य भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, पाणी पुरवठा समितीचे सर्व सभापती, नगरसेवक यांचे सहकार्य झाल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!