Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपुणे वकिल सोसायटी तज्ज्ञ संचालक पदी ॲड विष्णू तापकीर

पुणे वकिल सोसायटी तज्ज्ञ संचालक पदी ॲड विष्णू तापकीर

अर्जुन मेदनकर , पुणे

: पुणे वकिलांच्या ग्राहक सहकारी सोसायटी वर तज्ञ संचालक पदी ॲड विष्णू भिकू तापकीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र दि पुणे लॉयर्स कंझुमर्स को.ऑफ सोसायटीचे चेअरमन ॲड दादाभाऊ शेटे याचे हस्ते देण्यात आले. या प्रसंगी पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ काळे, पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे,बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी व सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी  ॲड विष्णू तापकीर , जयराम तांबे यांना तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीचे सर्व संचालक व वकिलांनी स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालक  विष्णू तापकीर आणि ॲड जयराम तांबे यांचा सत्कार सोसायटी तर्फे सत्कार करण्यात आला. पुणे वकिलांची ग्राहक सोसायटी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी असून या सोसायटी मध्ये सुमारे ८ हजारावर वकील सभासद आहेत.
विष्णू तापकीर हे गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ते वडमुखवाडी येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देखील कामकाज पाहत आहेत. या निवडीचे पिंपरी चिंचवड शहर, आळंदी चऱ्होली बुद्रुक पंचक्रोशीतून विविध सेवाभावी संस्था,पदाधिकारी,नागरिक,भाविकांनी स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!