Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेहडपसर मध्ये रोटी डे उत्साहात साजरा

हडपसर मध्ये रोटी डे उत्साहात साजरा

हडपसर प्रतिनिधी,
फेब्रुवारी महिन्यातील अठ्ठावीस दिवसांपैकी 14 दिवस आपली तरुण पिढी पाश्‍चात्त्यांचे सण साजरे करण्यात दंग होत चालली आहे. आणखी काही वर्षांनी तर तरुण पिढी भारतीय सण सुद्धा विसरून जातील. म्हणून आजच आपण आपल्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे.
भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान मानले जाते. अन्नदान हे तोच माणूस करतो जो संवेदनशील असतो. अन्नदानाची जनजागृती करण्यासाठी रोटी डे टीम हडपसर २०१६ या वर्षापासून दरवर्षी एक मार्च रोजी रोटी डे हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमात दर वर्षी ८० ते ९०कार्यकर्ते रोटी डे साठी कार्य करत असतात. या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन तीन पोळ्या किंवा चपात्या व कोरडी भाजी गोळा करून कै. विठ्ठल तुपे नाट्यगृह माळवाडी हडपसर येथे संकलित केले. नंतर रोटी डे च्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून उड्डाणपुलाखालील गरजूंना, सिग्नल वरील, फुटपाथवरील, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, खानावळी, होस्टेलमध्ये अशा विविध ठिकाणी जे गरजू लोक आहेत. त्यांच्यापर्यंत हे सर्व अन्नाचे पॅकेट्स पोचवले. बिबवेवाडी, कल्याणी नगर, खराडी, मुंढवा, लोणी, केडगाव, सांगली, येरवडा घोरपडी जुना बाजार या ठिकाणी सुद्धा येथील रोटी डे कार्यकर्त्यांनी त्या परिसरात अन्नदानाचे काम केले.
हडपसर मध्ये रोटी डेच्या उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे झालेल्या छोट्याशा कार्यक्रमास नगरसेवक मारुती आबा तुपे, बच्चू सिंग टाक, दत्ता दळवी, प्रशांत सुरसे, संजय शिंदे , महेश ससाणे या मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. नाझिम शेख (लिमरा स्कूल) आणि शोभा ताई लगड (एस आर विक्टरी स्कूल) यांने आपल्या स्कूल मधून विशेष प्रयत्न केले.. व रोटी डे च्या या उपक्रमाचे कौतुक केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या
सर्व महिला देहभान विसरून अननाच्या पॅकेट्स चे पॅकिंग करण्यात गुंग होऊन गेले होते. हे काम करताना त्यांना खूप आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मोरे यांनी केले व मान्यवरांचे आभार डॉ. शंतनु जगदाळे यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!