डॉ.डी.वाय. पाटील रिसर्च सेंटर आळंदीत महिला दिन साजरा

327

आळंदी, अर्जुन मेदनकर : डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे अंतर्गत आर.एच.टी.सी. आळंदी या ठिकाणी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ भाग्यश्री पाटील (प्रो व्हॉईस चान्सलर डी वाय पाटील विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले .या प्रसंगी प्रमुख पाहुणे डायरेक्टर ऑफ अकॅडमीक डी वाय पाटील विद्यापीठ डॉ. वत्सला स्वामी , आळंदी सह कोयाळी, मरकळ, सोळू, धानोरे, चऱ्होली, केळगाव, वडगांव घेनंद, भोसे येथील सर्व ग्राम पंचायत सरपंच,सी.एच.ओ. आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ जे. एस. भवाळकर , विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसिन डॉ अमिताभ बॅनर्जी यांच्या मार्गदर्शन मिळाले. डॉ वत्सला स्वामी यांनी महिला आणि त्यांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. डॉ बॅनर्जी यांनी महिला दिन यावर प्रकाश टाकला, शशिकला घेणंद , सुनीता पांढरे , यांनी स्त्रीपुरुष समानता यावर विचार व्यक्त केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण झाले. कार्यक्रमास डॉ. हेतल राठोड, डॉ. काजल श्रीवास्तव, डॉ. शिल्पा अरुनकुमार, डॉ एस व्ही कुलकर्णी, कालिदास तापकीर उपस्थित होते. गृहिणी मीनाताई पाखरे,एम.डी. पाखरे पत्रकार यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय आळंदी, नगरपरिषद आळंदी, पोलिस स्टेशन आळंदी येथील उपस्थित कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ वत्सला स्वामी यांनी महिला आणि त्यांची जबाबदारी यावर आपले विचार व्यक्त केले. डॉ बॅनर्जी यांनी महिला दिन यावर प्रकाश टाकला, शेषीकला घेणंद , सुनीता पांढरे , यांनी स्त्रीपुरुष समानता यावर विचार व्यक्त केले त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले. डॉ. हेतल राठोड, डॉ. काजल श्रीवास्तव, डॉ. शिल्पा अरुनकुमार, डॉ एस व्ही कुलकर्णी श्री कालिदास तापकीर उपस्थित होते. सूत्रसंचालन एम एस डब्ल्यू प्रविण कोल्हे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर एच टी सी आळंदी येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक हेल्थ सुप्रीडेटेंड जोसेफ चेरीयन यांनी केले . आभार डॉ श्वेता गांगुर्डे यांनी मानले.