अखंड हरिनाम सप्ताहात भजनसेवा उत्साहात कालभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

650

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील काळजे वाडी ग्रामदैवत भगवान श्री कालभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धारा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरीनाम गजरात करण्यात. यामध्ये विविध कार्यक्रम झाले. त्यामध्ये संगीत विशारद प्रसाद महाराज माटे – चऱ्होलीकर यांच्या श्री सद्गुरू संगीत विद्यालयात संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगीत भजन सेवा उत्साहात सादर केली.
श्री वाघेश्वर महाराज बाल भजनी मंडळ (प्रसाद माटे व शिष्य परिवार) भजन सेवा काळजेवाडी चऱ्होली येथे अखंड हरिनाम सप्ताहात भजनसेवा उत्साहात झाली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे यांच्या नेतृत्वात त्यांचे पिताश्री प्रतापकाका काळजे यांच्या हस्ते, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक प्रवीणशेठ काळजे यांच्या उपस्थितीत सेवक-यांचा सत्कार झाला. विशेष नियोजन व सहकार्य युवानेते बजरंग काळजे यांनी केले. या उपक्रमास श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी तबला साथ संगत अशोक नागरे गुरुजी यांनी दिली.

माटे महाराज यांचा संकल्प चऱ्होली गावातील भजन परंपरा भविष्यात आणखी समृद्ध करण्यासाठी काम करायचे आहे. बालपणापासून मुलांना जर आपण वारकरी संस्कार व भजन याचे ज्ञान दिले, तर त्या बालवयातील मुले वाईट सवयींच्या मागे न जाता त्यांच्या मनात भक्तिभाव जागृत होईल. यामुळे त्यांनी चऱ्होली गावातील त्यांच्या शिष्यांचे श्री वाघेश्वर महाराज बाल भजनी मंडळ स्थापन केले आहे. गावात अनेक ठिकाणी त्यांचे भजन अनेक सण व उत्सव तसेच सप्ताहातून सेवा तोटा आहे. यास प्रतिसादही मोठा मिळत आहे.
काळजेवाडी सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सर्व आजी माजी नगरसेवक माजी महापौर नितिन आप्पा काळजे, माजी नगरसेविका विनया तापकीर, सौ सुवर्णा, अजित बुर्डे आदी मान्यवर सहभागी झाले होते. सांगता काल्याच्या दिनी आमदार महेश लांडगे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सप्ताहात पहिल्या दिवशीय कार्यक्रमात भगवान श्री कालभैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शेवटच्या काल्याच्या दिवशी कलशारोहन करण्यात आले. समस्त ग्रामस्थ काळजेवाडी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री वाघेश्वर महाराज बाल भजनी मंडळाचे भजन सेवेचे सर्वानी कौतुक केले.