आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आळंदी यांच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थितीत व विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोक बनकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू ह.भ.प. नितीन महाराज मोरे, उपाध्यक्ष, लोक शिक्षण मंडळ, सिन्नर, नाशिक बंडूनाना भाबड, उद्योजक संतोष दिघे, पी. एस. आय. गोरेगाव, मुंबई गोरख शेळके, राजेंद्र शेळके नाशिक , माजी नगरसेविका सुनीता रंधवे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार दिपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, प्राचार्य दिपक मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले आदी उपस्थित होते. संस्थेचे खजिनदार दिपक पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतातून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. पण गत दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे हा सत्कार समारंभ आयोजित करता आला नाही. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
तदनंतर प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय व कॉलेज मधील एस. एस. सी. / एच. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये तसेच स्कॉलरशिप व एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी खजिनदार दिपक पाटील, संतोष दिघे, बंडूनाना भाबड, अध्यक्ष सुरेश वडगावकर, अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी शालेय गुणवंत मुलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिव अजित वडगावकर यांनी केलं. सुत्रसंचलन विकास शिवले व योगेश मठपती यांनी केले . आभार प्राचार्य दिपक मुंगसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता माऊलीच्या पसायदानाने झाली.