आळंदीत बालसंस्कार शिबिरात शिवराज्याभिषेक सोहळा

285

आळंदी / प्रतिनिधी : येथील ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर प्रशालेच्या विभागांत आयोजित पंच दिवशीय बालसंस्कार शिबीरात शिवराज्याभिषेक सोहळा रंगला. या सोहळ्यात विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरणाने बालसंस्कार शिबिराची सांगता शिवमय वातावरणात उत्साहात झाली.
बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी सेवा निवृत्त आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षणतज्ज्ञ बाबाजी काळे उपस्थित होते. सांगता समारंभास ह.भ.प.नवल महाराज, धर्मजागरण प्रमुख, धर्मजागरण पुणे जिल्हा प्रशासकीय प्रमुख व माजी उपसरपंच किरण मुंगसे, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर,मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी उपस्थित होते. या बालसंस्कार शिबिरात रामरक्षा स्तोत्र, संगीत चेंडू स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, मांडीवर चेंडू घेऊन जाणे, शिवराज्याभिषेक सोहळा आदी उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून शब्दबद्ध केली. मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम सादर करण्यात आली. प्रामुख्याने शिवराज्याभिषेक सोहळा इयत्ता बालवाडी ते पाचवी मधील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सादर करण्यात आला. विविध स्पर्धां मधील विजेते विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राजेंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या सवयी सांगितल्या. शिक्षणतज्ज्ञ बाबाजी काळे शालेय व्यवस्थापन समिती महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन बालसंस्कार या शब्दाचा अर्थ सांगून संस्कारांची माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. ह.भ.प.नवल महाराज यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशाला साक्षर करण्या बरोबर सुसंस्कृत करते असे गौरवोद्गार प्रशालेविषयी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच अर्जुन मेदनकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. धर्मजागरण प्रशासकीय प्रमुख पुणे जिल्हा व उपसरपंच केळगाव प्रमुख पाहुणे किरण मुंगसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट सांगून आदेशाचे पालन करण्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल उंबरकर, स्मिता रंधवे, मीरा जवादवार, रुपाली वाजे, ज्ञानेश्वरी काळे, आरती कुलकर्णी, कल्पना मोहिते, मनिषा राजमाने आदीनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनिषा दरेकर यांनी केले.मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी केले. उपशिक्षिका विद्या खराडे यांनी आभार मानले. यावेळी शिवमय वातावरणात बालसंस्कार शिबिराची सांगता उत्साहात झाली.